चाचा नेहरू बाल महोत्सवाचा समारोप
चाचा नेहरू बाल महोत्सवाचा समारोप
वाशिम, दि. 13 (जिमाका) : महिला व बालविकास विभागाच्या जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने चाचा नेहरू बाल महोत्सवाचे आयोजन 11 जानेवारी ते 13 जानेवारी 2023 या कालावधीत महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे करण्यात आले. बालकांचा आनंद व्दिगुणित करण्याकरीता आणि बालकांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्याकरीता पहिल्या दिवशी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये बालकांचा क्रीडात्मक विकास व्हावा, यादृष्टीने, कबड्डी, धावणे, गोळा फेक, निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेचे उद्घाटन बाल न्याय मंडळाच्या अध्यक्षा आर. बी. सोरेकर यांनी केले. यावेळी बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा डॉ. अलका मकासरे, जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेंद्र शिंदे, बाल कल्याण समिती सदस्य ॲड. अनिल उंडाळ, डॉ. मंजुषा जांभरूणकर व बालाजी गंगावणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
12 जानेवारी रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या सांस्कृतिक कार्यक्रमात कंझारा येथील सौ. वंदनाताई इंगोले बालगृहातील बालक व शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन एकल नृत्य व सामूहिक नृत्य सादर केले. या महोत्सवाला जिल्हयातील बालकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.
13 जानेवारी रोजी बक्षीस वितरण व समारोपीय कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून बाल विकास प्रकल्प अधिकारी मीनाक्षी भस्मे उपस्थित होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून बालकल्याण समिती सदस्य विनोद पट्टेबहादूर, ॲड. अनिल उंडाळ, डॉ. मंजुश्री जांभरुणकर, बालाजी गंगावणे, बाल न्याय मंडळाचे सदस्य प्रा.संदीप शिंदे व ॲड. प्रतिभा वैरागडे यांची उपस्थिती होती.
यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती भस्मे यांनी बालकांना उज्वल भविष्य घडविण्यासाठी परिश्रम घेऊन आपला विकास साधावा. असे आवाहन केले.
मनोगतातून श्री. पट्टेबहादूर, ॲड. श्रीमती वैरागडे, प्रा. श्री. शिंदे यांनी बालकांचे मनोबल व उत्साह वाढवण्याकरीता मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परीविक्षा अधिकारी गणेश ठाकरे, सहायक लेखाधिकारी आलिषा भगत, जिल्हा संरक्षण अधिकारी बंडू धनगर, दिशा मुलींचे निरीक्षणगृहाचे अधिक्षक गोपाल मोरे, तालुका संरक्षण अधिकारी धीरज उचित, महादेव जऊळकर, रामदास वानखडे, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे विधी अधिकारी जीनसाजी चौधरी, कायदा तथा परीविक्षा अधिकारी रमेश वाघ, अनंता इंगळे, रामेश्वर वाळले, एकनाथ राठोड, अजय यादव, रवी वानखेडे, अरुण हिरवे, दिशा मुलींचे निरीक्षण गृहाच्या समुपदेशक अनिता काळे व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. प्रास्तविक परीविक्षा अधिकारी गजानन पडघान यांनी केले. संचालन भगवान ढोले, लक्ष्मी काळे, प्रांजली चिपडे यांनी केले. आभार तालुका संरक्षण अधिकारी धीरज उचित यांनी मानले.
*******
Comments
Post a Comment