लेखा व कोषागारे विभागीय क्रीडा स्पर्धेत वाशिम जिल्हा सर्वसाधारण विजेता



लेखा व कोषागारे विभागीय क्रीडा स्पर्धेत

वाशिम जिल्हा सर्वसाधारण विजेता

 

वाशिम, दि. 10 (जिमाका) : लेखा व कोषागारे संचालनालयाअंतर्गत यवतमाळ येथे 7 व 8 जानेवारी दरम्यान अमरावती विभागीय क्रीडा स्पर्धा सन 2022-23 आयोजित करण्यात आल्या.या स्पर्धेत वाशिम जिल्हा संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. वाशिम जिल्हा संघाने विविध खेळ प्रकारात सहभागी होऊन विभागातील इतर जिल्ह्यातील संघापेक्षा उत्कृष्ट कामगि‍री करीत एकूण 15 क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक व 5 क्रीडा प्रकारामध्ये व्दितीय क्रमांक पटकाविला. जिल्ह्याला एकूण 29 पदकांसह अमरावती विभागाचे सर्वसाधारण विजेतेपद मिळाले.

       जिल्हा संघातील विविध खेळ प्रकारानुसार खेळाडुंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन जिल्ह्याला सर्वसाधारण विजेता होण्याचा मान प्राप्त करुन दिला. विशेषता यामध्ये महिला खेळाडुंनी उल्लेखनीय कामगीरी केली. जिल्ह्याच्या महिला खेळाडुंनी एकुण 11 क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक व 3 क्रीडा प्रकारात व्द‍ितीय क्रमांक मिळवून एकुण 20 पदके जिंकली.

           या क्रीडा स्पर्धेत जिल्हा कोषागार कार्यालय,स्थानिक निधी लेखा कार्यालय व जिल्ह्यातील इतर विभागात कार्यरत वित्त व लेखा सेवा संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभागी होऊन जिल्ह्याच्या विजयामध्ये महत्वाचे योगदान दिले.

           सांघीक खेळात प्रथम क्रमांक : खो-खो (महिला) अर्चना सावदेकर,शितल शिसोदे,अलीषा भगत,प्रि‍या कापसे,इरावती खिल्लारे,मनिषा शिंदे, क्षि‍तीजा काळे,संध्या मनवर व दिप्ती देशमुख, थ्रो बॉल : (महिला) अर्चना सावदेकर,शितल शिसोदे,अलीशा भगत,प्रि‍या कापसे,इरावती खिल्लारे,मनिषा शिंदे, क्षि‍तीजा काळे,संध्या मनवर व दिप्ती देशमुख, वैयक्तीक खेळात प्रथम क्रमांक : धावणे 100 मीटर (महिला) सहाय्यक लेखाधिकारी शितल शिसोदे, धावणे 200 मीटर (महिला) लेखा लिपीक क्षि‍तीजा काळे, रिले 400 मीटर (महिला) अर्चना सावदेकर,शितल शिसोदे , क्षि‍तीजा काळे,संध्या मनवर, लांब उडी (महिला) सहाय्यक लेखाधिकारी शितल शिसोदे, कॅरम एकेरी (महिला) सहाय्यक लेखाधिकारी अलीशा भगत, कॅरम दुहेरी (महिला) सहाय्यक लेखाधिकारी अलीशा भगत व लेखा लिपीक क्षितीजा काळे, टेबल टेनिस एकेरी (महिला) लेखा लिपीक दिप्ती देशमुख, टेबल टेनिस दुहेरी (महिला) दिप्ती देशमुख व संध्या मनवर, बॅटमिंटन दुहेरी (महिला) क्षितीजा काळे व संध्या मनवर, कॅरम एकेरी (पुरुष) उपकोषागार अधिकारी हमीद शाह, कॅरम दुहेरी (पुरुष) उपकोषागार अधिकारी हमीद शाह व उपकोषागार अधिकारी व्ही.पी.वानखेडे, टेबल टेनिस एकेरी (पुरुष) उपकोषागार अधिकारी व्ही.पी.वानखेडे, टेबल टेनिस दुहेरी (पुरुष) उपकोषागार अधिकारी एम.के.सरकटे व उपकोषागार अधिकारी व्ही.पी.वानखेडे.

        वैयक्तीक खेळात व्दि‍तीय क्रमांक प्राप्त खेळाडुमध्ये थाळीफेक (महिला) अर्चना सावदेकर,गोळाफेक (महिला) शितल शिसोदे, बॅटमिंटन एकेरी (महिला) क्षितीजा काळे, बॅटमिंटन दुहेरी (पुरुष) स्वप्नील गोटे, व्हि.एम.देशमाने आणि बुध्दीबळ (पुरुष) गणेश खाडे यांचा समावेश आहे.

         क्रीडा स्पर्धेत यश संपादन करण्याकरीता जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिनकर जाधव, स्थानिक निधी व लेखाचे सहाय्यक संचालक एम.व्ही.तायडे, जिल्हा कोषागार अधिकारी चंद्रकांत खारोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर कोषागार अधिकारी एम.के.सरकटे, एस.के. धांडे,उपकोषागार अधिकारी हमीद शाह, लेखाधिकारी युसुफ शेख ,सहाय्यक लेखाधिकारी अर्चना सावदेकर,उपकोषागार अधिकारी व्ही.पी. वानखेडे,जीवन पुसांडे, अजय आवारे, व्ही.जी.देशमाने, राजेश इंगोले, पी.आर.फरास,तुषार इंगळे व नागोराव रिठे यांनी अथक परिश्रम घेतले.


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश