रन फॉर लेप्रसी मॅरेथॉन स्पर्धा संपन्न



रन फॉर लेप्रसी मॅरेथॉन स्पर्धा संपन्न

      वाशिम, दि. 30 (जिमाका) : रन फॉर लेप्रसी मॅरेथॉनचे आयोजन सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (कुष्ठरोग) कार्यालय, वाशिम यांच्यावतीने आज 30 जानेवारी रोजी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ काळबांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ.संजय देशपांडे, जिल्हा रुग्णालयातील डॉ.श्री.मोरे, वैद्यकीय अधिकारी कुष्ठरोग डॉ.मिलींद जाधव, अँथेलेटिक असोसिएशनचे प्रतिनिधी चेतन शेंडे व ज्ञानेश्वर लाळगे, कुष्ठरोग व क्षयरोग विभागातील सर्व कर्मचाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती. या मॅरेथॉन स्पर्धेत जवळपास ९४ मुलामुलींचा सहभाग होता.

         रन फॉर लेप्रसी मॅरेथॉनच्या सुरूवातीला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानाची शपथ घेण्यात आली. त्यानंतर मॅरेथॉनला सुरुवात करण्यात आली. या रन फॉर लेप्रसी स्पर्धेत विजेत्या मुले व मुलींना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिक, प्रमाणपत्र, मानचिन्ह रोख बक्षीस मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. कार्यक्रमाच्या यस्वीतेसाठी कुष्ठरोग व क्षयरोग विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश