जिल्हा माहिती कार्यालयात बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन



जिल्हा माहिती कार्यालयात

बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

       वाशिम, दि. 06 (जिमाका) : मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 रोजी दर्पण हे पहिले मराठी नियतकालीक सुरु केले. हा दिवस मराठी पत्रकार दिन म्हणून राज्यात साजरा करण्यात येतो. त्याच अनुषंगाने जिल्हा माहिती कार्यालय येथे बाळशास्त्री जांभेकर यांना आयोजित कार्यक्रमात अभिवादन करण्यात आले. यावेळी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन जिल्हा नियोजन अधिकारी सुनिता आंबरे यांनी पुष्पहार अर्पण केला. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक दिनेश बारापात्रे, जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. विनय राठोड, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत, जिल्हा माहिती कार्यालयाचे राजू जाधव, विजय राठोड, गजानन डहाके व अनिल कुरकुटे यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती. उपस्थितांनी देखील बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्प वाहिली.

*******


Comments

Popular posts from this blog

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

विद्युत सुरक्षा सप्ताहाचा समारोप