सावित्रीबाई फुले ते जिजाऊ मॉ साहेब जयंती दरम्यान 12 जानेवारीपर्यंत बेटी बचाओ बेटी पढाओ जनजागृती अभियान
- Get link
- X
- Other Apps
सावित्रीबाई फुले ते जिजाऊ मॉ साहेब जयंती दरम्यान
12 जानेवारीपर्यंत बेटी बचाओ बेटी पढाओ
जनजागृती अभियान
वाशिम, दि. 03 (जिमाका) : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हया भारतीय आद्य शिक्षिका, समाजसुधारक कार्यकर्त्या होत्या. त्यांनी आशिया खंडातील पहिली मुलींची शाळा 1 जानेवारी 1848 रोजी सुरु केली. राज्यात स्त्री शिक्षण व शुद्रामध्ये शिक्षणाचा प्रसार केला. त्या भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका होत्या. महिला क्षेत्रात त्यांनी दिलेले महत्वपुर्ण योगदान विचारात घेता यावर्षी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस जिल्हयातील प्रत्येक अंगणवाडीमध्ये साजरा करण्यात येत आहे.
महिला व बाल कल्याण विभाग जिल्हा परिषद, वाशिम अंतर्गत बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियान अंतर्गत १२ जानेवारी २०२३ पर्यंत सावित्रीबाई फुले व जिजाऊ मॉ साहेब जयंतीनिमीत्त जनजागृती अभियान राबवुन जिल्हयात जयंती साजरी करण्यात येत आहे. अंगणवाडी केंद्रस्तरावर कार्यक्रम घेण्यात येत आहे. पाच वर्षाखालील मुलींचे कन्या पुजन करणे. मुलींच्या जन्माचा उत्सव साजरा करताना मुलींच्या जन्मावर वृक्षारोपण करणे. मुलींच्या आर्थिक स्थिरतेसाठी जागरुकता निर्माण करणे आणि पालकांना प्रोत्साहित करणे तसेच मुलींच्या उपलब्ध असलेल्या बँक खात्यात कुटूंबातील सदस्यांना पैसा जमा करण्याकरीता प्रोत्साहित करणे. टी. व्ही. आणि आकाशवाणी केंद्रावर मुलींच्या कल्याणासाठी सामुदायीक कृती करणे. याप्रमाणे जिल्हयातील प्रत्येक अंगणवाडी केंद्रामध्ये कार्यक्रम घेण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बाल कल्याण) संजय जोल्हे यांनी दिली.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment