पोलीस कवायत मैदान येथे प्रजासत्ताक दिनाचा 73 व्या वर्धापन दिन उत्साहात साजरा जिल्हाधिकारी षण्मुगराजन यांच्या हस्ते ध्वजारोहण



पोलीस कवायत मैदान येथे

प्रजासत्ताक दिनाचा 73 व्या वर्धापन दिन उत्साहात साजरा

जिल्हाधिकारी षण्मुगराजन यांच्या हस्ते ध्वजारोहण

वाशिम, दि. 26 (जिमाका) : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त वाशिम येथील पोलीस कवायत मैदान येथे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, जिल्हा पोलीस अधिक्षक बच्चन सिंह, सहाय्यक जिल्हाधिकारी श्रीमती मिन्नु पी.एम. अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी परेडचे निरीक्षण केले. वाशिम पोलीस दलाचे पुरुष व महिला पथकहोमगार्ड पुरुष व महिला दलबाकलीवाल विद्यालयाचे एनसीसी पथक, सुपखेला येथील यशवंतराव चव्हाण सैनिकी शाळेचे विद्यार्थीनवोदय विद्यालयाचे स्काऊट पथक, सुरकंडी येथील मुलींचे निवासी शाळेचे पथक, जिल्हा परिषद शाळेचे पथक, पोलीस बँण्ड पथक तसेच शिघ्र कृती दल, पोलीस दल श्वान पथक, पोलीस बॉम्ब शोधक पथक, पोलीस मोबाईल फॉरेन्सीक इनव्हेस्टीगेशन व्हॅन, पोलीस वॉटर कॅनॉन, शासकीय रुग्णालयाचे ॲम्बुलन्स पथक व नगरपरिषदेचे अग्निशमन दल आदी परेडमध्ये सहभागी झाले होते. यावेळी विविध पथकांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. जिल्हाधिकारी श्री. षण्मुगराजन यांनी या कार्यक्रमाला उपस्थित विविध क्षेत्रातील नागरीकांची सदिच्छा भेट घेतली.

           जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या हस्ते वीर पत्नी शांताबाई यशवंत सरकटे व पार्वतीबाई दगडू लहाणे यांचा सन्मान करण्यात आला. उपजिल्हाधिकारी सुहासिनी गोणेवार, कैलास देवरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिता आंबरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.विजय काळबांडे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धर्मपाल खेळकर, जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख शिवाजी भोसले, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक दिनेश बारापात्रे, राष्ट्रीय सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी राजेश वजीरे, अधीक्षक राहुल वानखडे तसेच विविध कार्यालयाचे कार्यालय प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.

          कार्यक्रमाचे संचालन राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालयाचे शिक्षक मोहन शिरसाठ यांनी केले. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार बांधव, नागरिक व विविध शाळेचे विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश