जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मतदान यंत्रांची प्रथम सरमिसळीकरण प्रक्रिया पूर्ण




विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९
·         मतदान यंत्रांचे विधानसभा मतदारसंघनिहाय वितरण
वाशिम, दि. २४ : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी विविध ठिकाणाहून जिह्याला प्राप्त झालेल्या मतदान यंत्रांच्या प्रथम सरमिसळीकरणाची प्रक्रिया (फर्स्ट रॅण्डमायझेशन) संगणकीय प्रणालीच्या सहाय्याने आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक यांच्या उपस्थितीत पूर्ण करण्यात आली.
यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन, उपजिल्हाधिकारी तथा ईव्हीएम व्यवस्थापन समितीचे नोडल अधिकारी रमेश काळे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, नायब तहसीलदार प्रकाश डाहोरे यांच्यासह राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या मतदानयंत्रांमधून प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान केंद्राच्या संख्येच्या १२६ टक्के बॅलेट युनिट व कंट्रोल युनिट, मतदान केंद्रांच्या संख्येच्या १३० टक्के व्हीव्हीपॅट याप्रमाणात मतदान यंत्रांचे वितरण करण्यासाठी प्रथम सरमिसळीकरण प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानुसार वाशिम येथील स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आलेल्या मतदान यंत्रांचे विधानसभा मतदारसंघ निहाय वितरण केले जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील सरमिसळ प्रक्रिया विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर होणार असून त्याद्वारे मतदान यंत्रांचे मतदान केंद्रनिहाय वितरण केले जाईल.

विधानसभा निहाय वितरीत मतदान यंत्रांचा तपशील
मतदारसंघ
मतदान केंद्र
(सहाय्यकारी मतदान केंद्रांसह)
बॅलेट युनिट
कंट्रोल युनिट
व्हीव्हीपॅट
३३-रिसोड
३३१
४१९
४१९
४३२
३४- वाशिम
३६९
४६७
४६७
४८२
३५- कारंजा
३५२
४४६
४४६
४६०
एकूण
१०५२
१३३२
 १३३२
१३७४


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश