निवडणूक खर्च निरीक्षक नरेंदर सिंग यांची राजगाव येथील स्थिर सर्वेक्षण पथकाला भेट
वाशिम, दि. २८ : निवडणूक रोकड, अवैध दारू तसेच शस्त्रास्त्रे यांची वाहतूक
होवू नये, याकरिता जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यासाठी जिल्ह्यातील प्रमुख
मार्गांवर स्थिर सर्वेक्षण पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. यापैकी वाशिम
हिंगोली मार्गावर राजगाव येथे कार्यान्वित करण्यात आलेल्या स्थिर सर्वेक्षण पथकाला
आज निवडणूक खर्च निरीक्षक नरेंदर सिंग यांनी भेट दिली. तसेच या पथकाकडून करण्यात
येत असलेल्या कार्यवाहीची माहिती घेतली.
यावेळी श्री. सिंग यांचे संपर्क अधिकारी संतोष कंदेवार
उपस्थित होते.
श्री. सिंग म्हणाले, स्थिर सर्वेक्षण पथकातील प्रत्येक
व्यक्तीने जिल्ह्यात येणाऱ्या व जिल्ह्यातून बाहेर जाणाऱ्या वाहनांची काळजीपूर्वक
तपासणी करावी. कोणत्याही परिस्थितीत रोकड, अवैध दारू, शस्त्रे अथवा इतर संशयास्पद
वस्तूची वाहतूक होवू नये, याची दक्षता घ्यावी. तसेच वाहनांची तपासणी करताना
सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही, याचीही काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी
केल्या.
Comments
Post a Comment