‘पोषण महिना’ अंतर्गत उपक्रमांची गती वाढवा - जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक
·
‘पोषण महिना’ अभियानाचा आढावा
वाशिम, दि. ०७ : जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या
‘पोषण महिना’ अभियानात सर्व संबंधित विभागांनी पूर्ण क्षमतेने काम करून या
अभियानांतर्गत प्रस्तावित केलेल्या उपक्रमांची गती वाढवावी. गाव, तालुका व
जिल्हास्तरावर जास्तीत जास्त संख्येने उपक्रम घेवून लोकांमध्ये पौष्टिक आहार व
बाबींविषयी जनजागृती करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी आज दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक
कुमार मीना यांच्यासह उपमुख्य कार्यकारी नितीन मोहुर्ले, जिल्हा आरोग्य अधिकारी
डॉ. अविनाश आहेर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अंबादास मानकर, जिल्हा क्रीडा अधिकारी
प्रदीप शेटीये, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुभाष राठोड, जिल्हा प्रशासन
अधिकारी दीपक मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री. मोडक म्हणाले, १ सप्टेंबरपासून
जिल्ह्यात पोषण महिना हे अभियान सुरु झाले आहे. बालकांचे पहिले १०० दिवस अॅनेमिया, अतिसार, हात धुणे आणि स्वच्छता,
पौष्टिक आहार आदी विषयी जनजागृती करणे हा या अभियानाचा उद्देश आहे.
याकरिता महिला व बाल कल्याण, शिक्षण, आरोग्य, पंचायत, नगरपरिषद व क्रीडा विभागाच्या
माध्यमातून अंगणवाडीस्तर, गाव, तालुका व जिल्हास्तरावर विविध उपक्रम आयोजित करण्याचे
नियोजन करण्यात आले आहे.
सर्व
संबंधित विभागांनी पोषण विषयक जास्तीत जास्त जनजागृती उपक्रमांचे आयोजन करणे
आवश्यक आहे. तसेच या उपक्रमांचा अहवाल दैनंदिन स्वरुपात ऑनलाईन अपलोड करावा, असे
ते म्हणाले. तसेच प्रत्येक विभागाने केलेल्या उपक्रमांचा आपण स्वतः आढावा घेणार
असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्य
कार्यकारी अधिकारी श्री. मीना म्हणाले, शिक्षण विभागाने प्रत्येक शाळेमध्ये किमान
दहा उपक्रमांचे आयोजन करून मुलांमध्ये आहार, स्वच्छता, हात धुणे आदी विषयी जनजागृती
करावी. अंगणवाडी स्तरावर सुद्धा अशा उपक्रमांचे आयोजन करून बालकांना व पालकांना
माहिती दिली जावी. महिला बचत गटांनी सुद्धा यामध्ये सक्रीय सहभाग नोंदवून जनजागृती
करावी. पोषण अभियान अंतर्गत ठरवून दिलेले उपक्रम विहित कालावधीत पूर्ण करावेत.
यामध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई सहन केली जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.
‘पोषण
महिना’ अभियान अंतर्गत आतापर्यंत विविध विभागांनी आयोजित केलेल्या उपक्रमांचा
तालुकानिहाय आढावा यावेळी घेण्यात आला.
‘कॉमन
अॅप्लिकेशन सॉफ्टवेअर’चा वापर वाढवा
अंगणवाडी
स्तरावर लाभार्थ्यांना उपलब्ध करून येणाऱ्या सुविधा तसेच इतर उपक्रमांची नोंद ऑनलाईन
स्वरुपात होण्यासाठी महिला व बाल कल्याण विभागाने ‘कॉमन अॅप्लिकेशन सॉफ्टवेअर’
विकसित केले आहे. याकरिता सर्व अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोन उपलब्ध करून देऊन
त्याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे अंगणवाडीस्तरावर होणाऱ्या
उपक्रमांची व पुरविण्यात येणाऱ्या सर्व सेवांची माहिती या सॉफ्टवेअरवर उपलोड
करण्यात यावी. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या अहवालानुसारच यापुढे
कार्यवाही होईल. त्यामुळे सर्व अंगणवाडी सेविकांनी या सॉफ्टवेअरचा वापर वाढवावा,
अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी यावेळी दिल्या.
Comments
Post a Comment