प्रगत शैक्षणिक कार्यक्रमाचा 48 हजारहून अधिक शाळांना लाभ


प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत एकूण 48 हजार 561 शाळा प्रगत झाल्या आहेत.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन राज्यातील शैक्षणिक सुविधा जागतिक दर्जाच्या व्हाव्यातयासाठी शिक्षण विभागाने हा उपक्रम 2015 साली सुरु केला.

या उपक्रमामध्ये शालेय मुलांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीवर लक्ष केंद्रित करण्यात येते.  या उपक्रमामध्ये विदयार्थ्यांमधील गुणवत्ता सुधारण्यासाठी वर्षातून 3 चाचण्या घेण्यात येतात. यामुळे शिक्षकांना विशिष्ट पद्धतीने शिकविण्यास मदत होते.

वाचनलेखनसंख्याज्ञान आणि संख्यांवरील क्रिया या शिक्षणासाठीच्या मूलभूत क्षमता आहेत.  प्रत्येक विद्यार्थ्याला सक्षमपणे प्राप्त होऊन त्याचा शैक्षणिक पाया पक्का व्हावा यावर प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत भर देण्यात येतो.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश