105 विद्यार्थ्यांनी साकारला बांबूचा बाप्पा!



मुंबई, दि. 7 :   बांबूपासून गणपती तयार करण्याची स्पर्धा चंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्ली स्थित "बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राने आयोजित केली. "आपला बांबू गणपती" या  स्पर्धेत चंद्रपूरातील १५ शाळातील १०५ विद्यार्थ्यांसह शाळांमधील शिक्षकांनीही यात सहभाग घेतला. 
विद्यार्थ्यांच्या हातातील ही कला थक्क करणारी असून  यामुळे पर्यावरण रक्षणाचे बीज त्यांच्या मनात रुजले जाईलअसा विश्वास वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.
बांबूच्या मुळापासूनटाकाऊ बांबूपासून बांबूच्या सुबक आणि सुंदर मूर्ती विद्यार्थ्यांनी घडवल्या.  त्यांनी तयार केलेल्या बांबूच्या गणेशमूर्तींनी राज्यभरातील गणेशभक्ताचे मनही जिंकून घेतले आहे.
कल्पकतेला आकाशही ठेंगणं असतं असं म्हणतात,  शाडू आणि मातीच्या मुर्तीबरोबर आता कागदाच्या लगद्याचाभाजीसुपारीअशा विविध पर्यावरणस्नेही वस्तुंचा  बाप्पा आकाराला येऊ लागलाय. चंद्रपूरातल्या शालेय विद्यार्थ्यांनी तर चक्क  "बांबूपासून गणपती" तयार केला आहे.
रोजगाराच्या संधी
बांबूमध्ये रोजगाराच्या अमाप संधी दडल्या आहेत हे लक्षात घेऊन बांबूला  वन विभागाच्या वाहतूक परवान्यातून मुक्त केले आहे. बांबू विकास मंडळ स्थापन करण्यात आले आहे. बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राने अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. यात बांबू पल्पपासून वस्त्रनिर्मितीकागद निर्मितीबांबू चटईबांबू हस्तकौशल्याच्या वस्तूबांबूचे घरगृहउपयोगी सामानऔद्योगिक उत्पादने,  बांबूपासून समईबांबूची सायकलबांबूपासून राख्यांची निर्मिर्तीबांबूचा राष्ट्रध्वज  आदिंचा त्यात समावेश आहे.
बांबू उद्योगाला चालना मिळावी व त्या वस्तूंना जागतिक बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून टाटा ट्रस्ट आणि बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र यांच्यात सामंजस्य करार झाल्याची माहिती श्री. मुनगंटीवार यांनी दिली.
पर्यावरण संरक्षणाचा संदेश बालवयात विद्यार्थ्यांना दिला तर पुढे आयुष्यभर हा संस्कार त्यांच्या कामी येतो आणि त्यांच्याकडून पर्यावरणाचे रक्षण होते. हे लक्षात घेऊनच बांबूपासून गणपती साकारण्याची कल्पना प्रत्यक्षात आणल्याचे केंद्राचे संचालक राहूल पाटील यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश