मुंबई, नागपूर, पुण्यात मेट्रोची 420 किमीची कामे वेगात


मुंबई,  नागपूर आणि पुणे या तीन महानगरात मेट्रोची 420 किमीची कामे वेगाने सुरु आहेत. यामध्ये मुंबई शहर व उपनगरांमध्ये 340 किमीपुण्यामध्ये 31.25 किमी व नागपूरमध्ये 38.215 किमी आणि नवी मुंबईमध्ये 11.10 किमी मेट्रोच्या कामांचा समावेश आहे. 

मुंबई शहर व महानगर प्रदेशात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने  एकूण 14 मेट्रो मार्ग उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी दहिसर ते डीएन नगर मेट्रो -ए कॉरिडॉरडीएन नगर ते मंडाले मेट्रो-बीवडाळा ते कासारवडवली मेट्रो -4, स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी मेट्रो - कॉरिडॉर आणि अंधेरी (पूर्व) ते दहिसर (पूर्व) मेट्रो -कॉरिडॉर यांचे काम यापूर्वीच सुरू झाले आहे. या पाचही मार्गामुळे 88.5 किमीचे मेट्रो जाळे तयार होईल. या मेट्रो मार्गांवर सुमारे 97 स्थानके असणार आहेत. या मार्गावरून सुमारे 50 लाख प्रवाशांची वाहतूक होण्याची शक्यता आहे.

वर्सोवा ते घाटकोपर हा मेट्रो मार्ग सुरू झाला असून या मार्गावरून दररोज सुमारे लाख प्रवाशांची वाहतूक होत आहे. यामुळे या मार्गावरील रस्ते वाहतुकीवरील ताण कमी होऊन नागरिकांचा इंधनावरील खर्चप्रवासाचा वेळ यांची बचत झाल्याचे दिसून आले आहे.

कुलाबा ते सिप्झ या 33.5 किमी अंतराच्या मेट्रो मार्गाचे काम वेगाने सुरू असून यामध्ये 26 भूमिगत स्थानके उभारण्यात येणार आहेत. या मार्गामुळे वाहनांच्या लाख फेऱ्या कमी होणार असून दररोज किमान लाख लिटर इंधनाची बचत होईल. मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रो मार्गांमुळे दरवर्षी सुमारे अडीच लाख टन कार्बन उत्सर्जन कमी होणार आहे. तर रस्त्यांवरील वाहतूक 25 ते 30 टक्के कमी होईल. 

सप्टेंबर 2019 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 42.2 किमीच्या आणखी तीन मेट्रो प्रकल्पांचे भूमिपूजन केले आहे. 9.2 कि.मी. लांबीच्या गायमुख ते शिवाजी चौक (मीरा रोड) मेट्रो -10 कॉरिडोर, 12.7 किमी लांबीचे वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो 11 कॉरिडॉर आणि 20.7 किमी लांबीचा कल्याण ते तळोजा मेट्रो -12 कॉरिडॉर यांचा समावेश आहे.

पुणे मेट्रो
 पुण्यामध्ये 31.254 किमीच्या दोन मेट्रो मार्गाची कामे सुरू आहेत. पहिला मार्ग पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते स्वारगेट हा 16.6 किमीचा असून यामध्ये 14 स्थानके उभारण्यात येतील. तर दुसरा मार्ग वनाज ते रामवाडी हा 14.7 किमीचा असून तो संपूर्ण एलिव्हेटेड असणार आहे. या मार्गावर 16 स्थानके असतील. पहिल्या मार्गाचे काम सन 2021 पर्यंत तर दुसऱ्या मार्गाचे काम डिसेंबर 2020 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. 

नागपूर मेट्रो
 नागपूरमध्ये सुमारे 38.21 किमीचा मेट्रो प्रकल्प राबविण्यात येत आहे. यापैकी 13.5 किमीचा मार्ग कार्यान्वित करण्यात आला आहे. ऊर्वरित मार्गावरील 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. खापरी ते सिताबर्डी या मार्गावरील काम पूर्ण झाले आहे. दुसऱ्या टप्प्यात नागपूर ग्रामीण भागात मेट्रो सुरू करण्यात येणार असून 48.6 किमीच्या टप्प्याच्या सविस्तर प्रकल्प अहवालाला मंजुरी मिळाली आहे. या मार्गावर सुमारे 35 स्थानके असणार आहेत.

                                    नवी मुंबई मेट्रो
नवी मुंबईमध्ये सिडकोच्या वतीने बेलापूर ते पेंधर या 11.10 किमीच्या मेट्रोचे काम सुरू आहे. या मार्गावरील मेट्रोची चाचणी घेण्यात आली आहे. या मार्गावर 11 स्थानके असतील. तळोजा पाचनंद येथे याचे डेपो व कार्यशाळा उभारण्यात येत आहे. हा मार्ग बेलापूरखारघरतळोजा औद्योगिक वसाहतकळंबोली व खांदेश्वर या भागाला जोडला जाणार आहे. त्यानंतर हा मार्ग प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालाही जोडण्यात येईल.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश