मतदान केंद्रांवर नियुक्तीसाठी उपलब्ध मनुष्यबळाचे प्रथम सरमिसळीकरण पूर्ण




विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९

वाशिम, दि. २३ : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यातील शासकीय अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. या अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नावे व माहिती संबंधित सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यामार्फत एनआयसीच्या प्रणालीवर अपलोड करण्यात आली आहे. या माहितीच्या आधारे मतदान केंद्रांवर नियुक्तीसाठी उपलब्ध मनुष्यबळाचे प्रथम सरमिसळीकरण आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले.

यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, मनुष्यबळ व्यवस्थापन समितीचे नोडल अधिकारी प्रशांत जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून नियुक्तीसाठी जिल्ह्यातून एकूण ८ हजार १३१ अधिकारी, कर्मचाऱ्यांची माहिती एनआयसीच्या प्रणालीवर अपलोड करण्यात आली. यापैकी रिसोड विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील २ हजार ५५२, वाशिम विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील ३ हजार १६२, कारंजा विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील २ हजार ४१७ अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यामधून मतदान केंद्राध्यक्ष, प्रथम मतदान अधिकारी व इतर दोन मतदान अधिकाऱ्यांची मतदानविषयक प्रशिक्षणासाठी व पुढील सरमिसळीकरण्यासाठी निवड करण्यासाठी आज जिल्हाधिकारी श्री. मोडक यांच्या उपस्थितीत संगणकीय प्रणालीच्या सहाय्याने प्रथम सरमिसळीकरण करण्यात आले. याद्वारे ६ हजार ६९२ अधिकारी, कर्मचाऱ्यांची मतदान केंद्राध्यक्ष, प्रथम मतदान अधिकारी व इतर मतदान अधिकारी म्हणून निवड करण्यात आली.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश