मंगरुळपीर येथे 23 मे रोजी स्त्री शक्ती समस्या समाधान





मंगरुळपीर येथे 23 मे रोजी

स्त्री शक्ती समस्या समाधान

       वाशिम, दि. 19 (जिमाका) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समस्या समाधान शिबीराच्या माध्यमातून मंगरुळपीर तालुक्यातील महिलांच्या समस्यांचे निराकरण केले जाणार आहे. मंगरुळपीर येथील जुन्या  पंचायत समितीच्या सभागृहात 23 मे रोजी या समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

          महिलांकरीता शासनाच्या विविध विभागामार्फत राबविण्यात येत असणाऱ्या योजनांची माहिती देणे, महिलांच्या स्थानिक समस्यांचे निराकरण करणे तसेच महिलांना न्याय मिळवून देण्याच्या अनुषंगाने हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समस्या समाधान शिबीर घेण्यात येत आहे. शिबीरास मंगरुळपीर तालुक्यातील महिलांनी उपस्थित राहून आपल्या समस्यांचे निराकरण करुन घेण्याचे आवाहन मंगरुळपीरचे तहसिलदार, गटविकास अधिकारी व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.

          या शिबीरात मंगरुळपीर तालुक्यातील नगरपालिका, महसुल, कृषी, महिला आर्थिक विकास महामंडळ व उमेद (बचतगट) अन्न व नागरी पुरवठा, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, शिक्षण, पोलीस, पाणी पुरवठा, स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम, महावितरण, विधी सेवा प्राधिकरण यासह विविध विभागाशी संबंधित समस्या मांडता येणार आहे. असे तहसिलदार तथा अध्यक्ष, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्त्री शक्ती समस्या समाधान शिबीर, मंगरुळपीर यांनी कळविले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे