प्रधानमंत्री कुसुम-ब योजना कृषीपंप सौरऊर्जा विद्युतीकरण : ऑनलाईन सुविधा उपलब्ध



प्रधानमंत्री कुसुम-ब योजना

कृषीपंप सौरऊर्जा विद्युतीकरण : ऑनलाईन सुविधा उपलब्ध

       वाशिम, दि. 30 (जिमाका) : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कुसुम-ब योजनेअंतर्गत कृषीपंपांना सौरऊर्जेवर आधारित विद्युतीकरण देण्यासाठी ऑनलाईन अर्ज सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.

       अपारंपारिक उर्जा स्त्रोतांचा विकास करण्यासाठी शासन वेळोवेळी प्रोत्साहन देत आहे. त्याअंतर्गतच शेतकऱ्यांच्या कृषीपंप वीज जोडण्या सौर उर्जेवर करण्याचे काम केले जात आहे. त्यासाठी स्वयंअर्थसहाय्यित तसेच केंद्र शासनाच्या अर्थसहाय्यातून विविध योजना राबविण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाअभियानाला अर्थात प्रधानमंत्री कुसुम योजनेला राज्यात गती देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या योजनेअंतर्गत दरवर्षी एक लाख याप्रमाणे सौर उर्जेवर चालणारे कृषी पंप स्थापित करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना ९० टक्के व अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना ९५ टक्के अनुदानावर सौर कृषीपंप उपलब्ध आहेत. सौर कृषीपंप स्थापित करण्याचे उद्दिष्ट हे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर पूर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी महाऊर्जामार्फत ऑनलाईन पोर्टल सुरु करण्यात आले आहे. १७ मे पासून नवीन अर्ज स्विकारणे सुरु आहे. 

           शेतकऱ्यांनी https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B या लिंकवर जाऊन अर्ज करावा. योजनेची सविस्तर माहिती ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धती याबाबत www.mahaurja.com या संकेतस्थळावर सर्व माहिती उपलब्ध आहे. बनावट संकेतस्थळाचा वापर करु नये. वाशिम जिल्ह्यात आतापर्यंत 773 अर्ज प्राप्त झाले आहेत. महाऊर्जामार्फत सुरु केलेल्या ऑनलाईन पोर्टलचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करतांना अडचणी असल्यास ०२०-३५०००४५६/०२०-३५०००४५७ तसेच 07232-241150या दूरध्वनी क्रमांकावर तक्रार करावी. असे आवाहन महाऊर्जाच्या वतीने करण्यात आले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे