दिव्यांग व्यक्तींनी कर्ज मागणीसाठी महामंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा




दिव्यांग व्यक्तींनी कर्ज मागणीसाठी

महामंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा

       वाशिम, दि. 17 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या कर्ज योजनेअंतर्गत सन 2023-24 या आर्थिक वर्षात 200 दिव्यांग व्यक्तींना कर्ज मागणी अर्ज वितरीत करण्याकरीता कर्ज मागणी अर्ज उपलब्ध आहे. महामंडळाच्या दिव्यांग स्वावलंबन कर्ज योजनेअंतर्गत 100 तसेच वैयक्तिक थेट कर्ज योजनेमध्ये 100 असे एकूण 200 अर्ज कार्यालयात उपलब्ध आहेत. पात्र इच्छूक व्यक्तींनी कर्ज मागणी संदर्भात महामंडळाचे जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, चिखली रोड, वाशिम येथे संपर्क साधून कर्ज मागणी अर्ज प्राप्त करुन घ्यावा. असे आवाहन महाराष्ट्र राज्य वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक सुरेंद्र यावलीकर यांनी केले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे