अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त पिडीत महिलांसाठी स्त्री शक्ती समाधान शिबीर
- Get link
- X
- Other Apps
अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त
पिडीत महिलांसाठी स्त्री शक्ती समाधान शिबीर
वाशिम, दि. 16 (जिमाका) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त 31 मे पूर्वी समस्याग्रस्त व पिडीत महिलांचे विविध विभागाशी संबंधित असलेले प्रश्न एकाच व्यासपिठावरुन सोडविण्यासाठी तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली गटविकास अधिकारी यांच्या सहकार्याने संबंधित तालुक्यात बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्यास्तरावर पिडीत महिलांसाठी स्त्री शक्ती समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. वाशिम तालुका - 17 मे, मालेगांव तालुका - 18 मे, रिसोड तालुका - 19 मे, मानोरा तालुका - 22 मे, मंगरुळपीर तालुका - 23 मे व कारंजा तालुका 24 मे रोजी या शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे.
तरी समस्याग्रस्त पिडीत महिलांनी आपल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपआपल्या तालुक्यातील बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याशी संपर्क साधून आपल्या अडचणी शिबीराच्या किमान एक दिवस आधी त्यांच्या समोर मांडाव्यात. म्हणजेच या दिवशी संबंधित महिलांच्या समस्यांचे निराकरण करणे सोयीचे होईल. असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, वाशिम यांनी कळविले आहे.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment