मंगरुळपीर तहसिल येथे विशेष शिबीर संपन्न




मंगरुळपीर तहसिल येथे

विशेष शिबीर संपन्न

       वाशिम, दि. 17 (जिमाका) : शासकीय योजनांची जत्रेच्या अनुषंगाने 16 मे रोजी तहसिल कार्यालय, मंगरुळपीर येथे विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीरात तहसिलदार रवि राठोड आणि संजय गांधी योजनेचे नायब तहसिलदार यांनी तहसिल कार्यालयामार्फत दिल्या जाणाऱ्या विविध सेवा आणि योजनांची माहिती तसेच विशेष सहाय्य योजनेअंतर्गत राज्य व केंद्र पुरस्कृत योजनांची माहिती उपस्थित लाभार्थ्यांना दिली. तसेच या योजनांचा लाभ घेण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची माहिती देखील उपस्थित नागरीकांना देण्यात आली. या शिबीरात पात्र लाभार्थ्यांकडून नवीन प्रकरणे मंजुरीकरीता तपासणी करुन लाभ मंजूर करुन देण्यात आला.

          या विशेष शिबीरात श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे 13 अर्ज स्विकारुन लाभ मंजूर करण्यात आला. संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत दिव्यांग, मतीमंद व दुर्धर आजार असलेल्या 63 लाभार्थ्यांचे अर्ज स्विकारुन लाभ मंजूर करण्यात आला. विधवा आणि परितक्त्या असलेल्या 37 महिलांचे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे अर्ज स्विकारुन लाभ मंजूर करण्यात आला. तसेच 28 पात्र लाभार्थ्यांना आर्थिक वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. शासकीय योजनांची जत्रेच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या शिबीरात 141 लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे