ग्रामपंचायत पोटनिवडणूक तीन दिवस प्रतिबंधात्मक आदेश




ग्रामपंचायत पोटनिवडणूक

तीन दिवस प्रतिबंधात्मक आदेश

       वाशिम, दि. 16 (जिमाका) : ग्रामपंचायत पोटनिवडणूकी दरम्यान मतदान व मतमोजणीच्या दिवशी नागरीक राजकीय कारणावरुन विनाकरण भांडण तंटे करतात. त्याचे रुपांतर मोठया भांडणात किंवा घटनेत होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता असते. या सर्व बाबींना प्रतिबंध घालण्यासाठी व निवडणूक प्रक्रियेदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्याच्या उद्देशाने निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोणातून निवडणूकी दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्याकरीता संबंधित मतदान केंद्र परीसरात 17 मे 2023 रोजीच्या सकाळी 6 ते 18 मे 2023 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत आणि मतमोजणीच्या दिवशी 19 मे 2023 रोजी मतमोजणीच्या ठिकाणी मतमोजणी प्रक्रीया सुरु झाल्यापासून ते मतमोजणीची संपूर्ण प्रक्रीया संपेपर्यंत फौजदारी दंड संहिता 1973 चे कलम 144 जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी षण्मुगराजन एस. यांनी लागू केले आहे.

          हा आदेश लागू केल्यामुळे पुढील बाबींना मनाई करण्यात आली आहे. धार्मिक स्थळांचा निवडणूकीसाठी उपयोग करण्यात येऊ नये. आचार संहितेच्या संपुर्ण काळात सार्वजनिक ठिकाणी शस्त्र जवळ बाळगता येणार नाही. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या ठिकाणी 100 मिटर परिसरात निवडणूकीच्या कामाव्यतिरिक्त कोणताही व्यक्ती प्रवेश करणार नाही. मतमोजणीच्या ठिकाणी 100 मिटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू राहील. असेही या आदेशात नमुद करण्यात आले आहे.   

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे