कारंजा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 25 मे रोजी युवाशक्ती करीअर शिबीर
- Get link
- X
- Other Apps
कारंजा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत
25 मे रोजी युवाशक्ती करीअर शिबीर
वाशिम, दि. 24 (जिमाका) : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कारंजा (लाड) येथे 25 मे 2023 रोजी सकाळी 10 वाजता छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करीअर शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबीराचे उदघाटन आ. राजेंद्र पाटणी यांच्या हस्ते होणार आहे. या शिबीरात जागतिक कौशल्याची व्याप्ती आणि रोजगाराच्या संधी, इयत्ता 10 वी व 12 वी नंतरचे महाविद्यालयीन शिक्षण व अभ्यासक्रम, महाविद्यालयामध्ये अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रीया, कालामापन चाचणी, शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना व कर्ज योजना माहिती आणि करीअर दर्शनी इत्यादीबाबत तज्ञ मार्गदर्शकाकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. तरी इयत्ता 10 वी व 12 वी उत्तीर्ण प्रशिक्षणार्थी व त्यांचे पालकांनी जास्तीत जास्त प्रमाणात उपस्थित राहावे. असे आवाहन कारंजा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांनी केले आहे.
*******
- Get link
- X
- Other Apps
hhh
ReplyDelete