दिव्यांग व्यक्तींना सहाय्यक साधनेवाटपासाठी तपासणी शिबीर17 मे - देगांव आणि 18 मे - मालेगांव


दिव्यांग व्यक्तींना सहाय्यक साधने

वाटपासाठी तपासणी शिबीर

17 मे - देगांव आणि 18 मे - मालेगांव

        वाशिम, दि. 11 (जिमाका) : दिव्यांग सशक्तीकरण विभाग, सामाजिक न्याय विभाग व अधिकारीता मंत्रालय, भारत सरकारच्या एडीप योजनेअंतर्गत वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदार संघातील दिव्यांग व्यक्तींना मोफत कृत्रिम अवयव व साहित्य वितरण करण्यासाठी रिसोड तालुक्यातील आयुर्वेदिक महाविद्यालय, देगांव येथे  17 मे रोजी सकाळी 8 ते दुपारी 12 आणि दुपारी 4 ते सायंकाळी 7 या वेळेत दिव्यांग व्यक्तींना लागणाऱ्या कृत्रिम अवयव साहित्यासाठी तपासणी शिबीर आयोजित केले आहे. या शिबीराचे शिबीर प्रमुख म्हणून रिसोड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यु.डी. राजपुत (9421326078) हे असतील.

            मालेगांव येथील ना.ना. मुंदडा हायस्कुल येथे दिव्यांग व्यक्तींच्या तपासणी शिबीराचे आयोजन 18 मे रोजी सकाळी 8 ते दुपारी 12 आणि दुपारी 4 ते सायंकाळी 7 या वेळेत केले जाणार आहे. या शिबीराचे शिबीर प्रमुख म्हणून मालेगांव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी के.एस. काळपांडे (9011651428) हे असतील. या तपासणी शिबीरात दिव्यांग लाभार्थ्यांनी 40 टक्के किंवा त्यापेक्षा जास्तीचे दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र, 22,500 रुपये किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला, आधार कार्डची झेरॉक्स प्रत व पासपोर्ट आकाराचे 2 फोटो सोबत आणावे. जिल्हयातील जास्तीत जास्त दिव्यांग लाभार्थ्यांनी या तपासणी शिबीराचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे.  

*******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे