दिव्यांग समावेशक सुलभकर्त्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण
- Get link
- X
- Other Apps
दिव्यांग समावेशक सुलभकर्त्यांना
पालकमंत्र्यांच्या प्रमाणपत्रांचे वितरण
वाशिम, दि. 12 (जिमाका) : पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात दिव्यांग समावेशक सुलभकर्त्यांना “ स्पार्क ” प्रशिक्षण प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या दिल्ली येथील प्रतिनिधी श्रीमती रचनासिंग, महिला आर्थिक विकास महामंडळाचे विभागीय सनियंत्रण व मुल्यमापन अधिकारी केशव पवार, जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हयातील दिव्यांग व्यक्तींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाकडून आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या सहकार्याने “ स्पार्क ” हा पथदर्शी प्रकल्प देशात केवळ वाशिम जिल्हयात राबविण्यात येत आहे. जिल्हयातील दिव्यांग व्यक्तींना अधिक सुकरपणे जीवन जगण्याची संधी प्राप्त व्हावी, यासाठी हा प्रकल्प जिल्हयात राबविण्यात येत आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पात दिव्यांगासाठी काम करणारे व्यक्तीही दिव्यांगच आहेत. जिल्हयात महिला आर्थिक विकास महामंडळाच्या 11 लोकसंचालित साधन केंद्राअंतर्गत या प्रकल्पात दिव्यांग समावेशक सुलभकर्ता म्हणून हे दिव्यांग व्यक्ती काम करीत आहे. स्पार्क प्रकल्पात काम करणाऱ्या नसीम मांजरे (वाशिम), वंदना पावडे (अनसिंग), आरती हिंगमिरे व रेश्मा नवरंगबडी (उंबर्डा बाजार), लता कोरडे (रिसोड), अमोल जाधव व राधिका भोयर (मालेगांव), दिगांबर गांजरे (मंगरुळपीर), शिवाणी पन्नासे (धानोरा), सुमित्रा गव्हाणे (कारंजा) व दत्तात्रय राठोड (पोहरादेवी) या दिव्यांग समावेशक सुलभकर्त्यांना पालकमंत्री संजय राठोड यांनी स्पार्क प्रकल्पाचे प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र वितरीत केले.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment