जलयुक्त शिवार अभियान166 गावात 3 हजार 977 कामे प्रस्तावित 2087 कामांचे अंदाजपत्रके तयार 341 कामांना प्रशासकीय मान्यता


जलयुक्त शिवार अभियान

166 गावात 3 हजार 977 कामे प्रस्तावित

2087 कामांचे अंदाजपत्रके तयार

341 कामांना प्रशासकीय मान्यता

       वाशिम, दि. 16 (जिमाका) : पावसाची अनियमितता व पावसातील खंड यामुळे पिकाच्या ऐन वाढीच्या काळात टंचाई सदृश्य परिस्थीती निर्माण होऊन त्याचा परिणाम कृषी क्षेत्रावर होतो. मुलस्थानी जलसंधारणाचे उपचार राबविण्यासोबतच सुक्ष्म सिंचनाचा वापर वाढविणे, पाण्याच्या ताळेबंदाच्या माध्यमातून जल साक्षरता वाढविण्याची बाब लक्षात घेवून गावांचा शाश्वत विकास करण्याच्या दृष्टिने जिल्हयात जलयुक्त शिवार अभियान 166 गावात राबविण्यात येत आहे. या गावांमध्ये 3 हजार 977 कामे प्रस्तावित आहे. त्यापैकी 2087 कामांचे अंदाजपत्रके तयार करण्यात आली असून 341 कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या अभियानात वन विभागाची वाशिम तालुक्यात 141, मंगरुळपीर तालुक्यात 3 आणि रिसोड तालुक्यात 3 अशी एकूण 147 कामे पूर्ण झाली आहे. 

         वाशिम तालुक्यातील अटकळी, गणेशपूर, वाघोली (बु.), पार्डी (एकबुर्जी), वांगी, अनसिंग, खडसिंग, पिंपळगांव, शेलु (खु.), बिटोडा (तेली), अंजनखेडा, पार्डी टकमोर, अडगांव (काटा), देवठाणा (बु.), तामसी, तामसाळा, सोनखास, तोंडगांव, झाकलवाडी, बाभुळगांव, ब्राम्हणवाडा (आसोला), फाळेगांव (थेट), जांभरुण (जहाँगीर), जांभरुण (परांडे), काकडदाती व पार्डी (आसरा) ही 26 गावे, रिसोड तालुक्यातील पंतापूर, पाटवद, केशवनगर, आसेगांव (पेन), देऊळगांव (बंडा), गोवर्धन, कोयाळी (बु.), कोयाळी (खु.), कोयाळी (केनवड), मांगुळ (झनक), नावली, नेतनसा, वनोजा, वरुड (तोफा), येवती, केनवड, नंधाना, मांडवा, चिचांबाभर, जवळा, कळमगव्हाण ही 21 गावे.

         मालेगांव तालुक्यातील ब्राम्हणवाडा (खु.), भामटवाडी, कळंबेश्वर, ढोरखेडा, घाटा (शिरपूर), जामठी, किन्ही (घोडमोड), कोटा, साक्रापूर, तिवडी, वसारी, गांगलवाडी, खैरखेडा, देवठाणा (खांब), खेर्डी, कोलदरा, वाकलवाडी, मुसळवाडी, शिरपूर, अमाना, डव्ही, इराळा, केळी, सुकांडा, भौरद, भिलदुर्ग, ब्राम्हणवाडा (मारसुळ) व चांडस ही 28 गावे, मंगरुळपीर तालुक्याती भूर, मजलापूर, पूर, शेंदुर्जना (मोरे), तांदळी, वनोजा, बिटोडा (भोयर), दाभाडी, दाभा, रामगड, फाळेगांव, आसेागांव, बोरव्हा (खु.), चिंचखेड, इचोरी, कासोळा, लावणा, पिंपळगांव, सारसी, सावरगांव, शेगी, नांदगांव व साळंबी ही 23 गावे,

          मानोरा तालुक्यातील ढोणी, हिवरा (खु.), इंगलवाडी, रुई, शेंदुर्जना (अढाव), जवळा (खु.), नायगांव (बंदी), शिंगणापूर, वाईगौळ (तांडा), देरडी, घोटी, खापरी, रुद्राळा, खंडाळा, वारडा, अभयखेडा, डोंगरगांव, आमगव्हाण, बालाजीनगर, भिलडोंगर, चिखली, खापरदरी, देऊळवाडी, देवठाणा, धामणी (मानोरा), धानोरा (बु.), धानोरा (खु.), गिर्डा, गुंडी, हातना, हट्टी, जामदरा व ज्योतिबानगर अशी 33 गावे आणि कारंजा तालुक्यातील भिवरी, ढंगारखेड, धनज (बु.), डोंगरगांव, हिंगणवाडी, नागलवाडी, मालेगांव, राहटी, रामटेक, शहादत्तपूर, शिरसोली, दाबापूर, सुकळी, बगी, इसाफपूर, महागांव, अनाई, बेंबळा, हसनापूर, जलालपूर, कामरगांव, खानापूर, खेर्डा (खु.), कुऱ्हाड, महमदापूर, म्हसला (लोधीपूर), शिवण (बु.), सुकली, टाकळी (खु.), विळेगांव, वडगांव, टाकळी (बु.), आंतरखेड व गिर्डा अशी एकूण 35 गावे या अभियानात समाविष्ट आहे.   

          जलयुक्त शिवार अभियान 2.0 या अभियानांतर्गत जिल्हयातील 166 गावात 3 हजार 977 कामे प्रस्तावित असून 2 हजार 87 कामांचे अंदाजपत्रके तयार आहेत. त्यापैकी 341 कामांचा प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. निविदा प्रक्रीयेमध्ये 93 कामे असून 55 कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. 52 कामे सुरु करण्यात आले आहे. पुर्ण झालेल्या कामांची संख्या 147 इतकी आहे.

           कृषी विभागामार्फत 2 हजार 93 कामे, 527 कामे जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभाग, भूजल आणि सर्व्हेक्षण विकास यंत्रणेची 550 कामे, मृद व जलसंधारण विभागाची 139 कामे आणि वन विभागाची 668 कामे प्रस्तावित आहे. वन विभागाची 141 कामे वाशिम तालुक्यातील पूर्ण करण्यात आली आहे. तर जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाची 3 कामे पूर्ण झाली आहे. कृषी विभागाच्या मंगरुळपीर तालुक्यातील 43 कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आला असून 43 कामे सुरु आहे.    

*******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे