पांडव (उमरा) येथे किसान गोष्टी कार्यक्रम संपन्न
- Get link
- X
- Other Apps
पांडव (उमरा) येथे किसान गोष्टी कार्यक्रम संपन्न
वाशिम, दि. 26 (जिमाका) : वाशिम तालुक्यातील पांडव उमरा येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत क्षेत्रीय किसान गोष्टी कार्यक्रम आज 26 मे रोजी आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक वाशिम जयप्रकाश लव्हाळे यांनी अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत सोयाबीन प्रात्यक्षिक तसेच सोयाबीन लागवड करतांना टोकन यंत्राने लागवड करावी. बीज प्रक्रीया केल्याशिवाय शेतकऱ्यांनी लागवड करू नये तसेच हंगाम पूर्व सर्वांनी निंबोळ्या गोळा करून निंबोळी अर्क तयार करण्यासाठी जतन करुन ठेवाव्यात असे आवाहन केले.
कोकण पद्धतीने सोयाबीन लागवडीचे फायदे, निंबोळी अर्काचा वापर केल्याने होणारे फायदे व खर्चातील बचत याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमामध्ये गावातील प्रतिष्ठित नागरिक पुंडलिक ढोबळे, माणिक खिल्लारे, संजय ढोबळे, संघपाल जावळे, महिला बचत गटाच्या सदस्य वंदना सरकटे, आशा खिल्लारे, मंगला हिवराळे, तसेच शेतकरी मोहन कांबळे, मदन कांबळे, मालता खिल्लारे, विशाखा खिल्लारे, मिराबाई खिल्लारे, वैशाली हिवराळे, वंदना खिल्लारे, कमलाबाई खंदारे, उद्धव खंदारे, निर्मला कांबळे, विशाखा वैद्य व देवदया जावळे यांचेसह बचत गटातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी टोकन यंत्राचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. बियाणे उगवण शक्ती तपासणी आणि बीज प्रक्रिया याबाबत सुद्धा मार्गदर्शन करण्यात आले.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment