५ मे रोजीचे युवाशक्ती करिअर शिबिर स्थगित
५ मे रोजीचे युवाशक्ती करिअर शिबिर स्थगित
वाशिम दि ०३ (जिमाका) जिल्ह्यातील विद्यार्थी व युवक - युवती यांना विविध क्षेत्रातील शिक्षणाच्या संधी तसेच रोजगार व स्वयंरोजगाराबाबत समुपदेशन करण्यासाठी ५ मे रोजी वाशिम येथील आरे महाविद्यालयात सकाळी १०.३० वाजता छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
परंतु काही कारणास्तव हे शिबीर स्थगित करण्यात आले असून या शिबिराची पुढील तारीख कळविण्यात येईल.अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज यांनी दिली.
Comments
Post a Comment