जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता 11 वी प्रवेश अर्ज आमंत्रित



जवाहर नवोदय विद्यालय

इयत्ता 11 वी प्रवेश अर्ज आमंत्रित

       वाशिम, दि. 12 (जिमाका) : जवाहर नवोदय विद्यालय पार्श्व प्रवेश चाचणी इयत्ता 11 वी करीता सन 2023-24 चे प्रवेश अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरण्यास सुरुवात झाली आहे. जिल्हयातील मान्यताप्राप्त शाळा सीबीएसई किंवा इतर कोणत्याही राज्य शिक्षण मंडळाशी संलग्न/अन्य शासन मान्यता प्राप्त मंडळ येथे जवाहर नवोदय विद्यालय शैक्षणिक सत्र 2022-23 दरम्यान स्थित आहे. सत्र 2022-23 पूर्वी इयत्ता 10 वी उत्तीर्ण झालेले उमेदवार पात्र नाहीत. फक्त भारतातील रहिवासी जे इयत्ता 10 वी भारतातून शिकला आहे तो परिक्षेस पात्र आहे. ऑनलाईन पध्दतीने नोंदणी पूर्णत: मोफत राहील. फॉर्म भरण्यासाठी www.navodaya.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा. ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याकरीता शेवटची तारीख 31 मे 2023 आहे. फॉर्ममधील चुका दुरुस्तीसाठी correction window 1 व 2 जुन 2023 रोजी सुरु राहील. असे जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य एस.डी. खरात यांनी कळविले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे