जत्रा शासकीय योजनांची यंत्रणांनी लाभार्थ्यांना लाभ देण्याचे सुक्ष्म नियोजन करावे-षण्मुगराजन एस



जत्रा शासकीय योजनांची

यंत्रणांनी लाभार्थ्यांना लाभ देण्याचे सुक्ष्म नियोजन करावे

-षण्मुगराजन एस.

       वाशिम, दि. 16 (जिमाका) : शासनाच्या अनेक लोककल्याणकारी योजना आहेत. हया योजना विविध विभागामार्फत राबविण्यात येतात. शासकीय योजनांच्या लाभापासून कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहू नये. यासाठी जत्रा शासकीय येाजनांची या उपक्रमातून यंत्रणांनी लाभार्थ्यांना लाभ देण्याचे सुक्ष्म नियेाजन करावे. असे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले.

           आज जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात “ जत्रा शासकीय योजनांची ” या उपक्रमाच्या अनुषंगाने आयोजित सभेत श्री. षण्मुगराजन बोलत होते. सभेला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांची प्रमुख उपस्थिती होती.

          श्री. षण्मुगराजन बोलतांना पुढे म्हणाले, सर्व यंत्रणांना त्यांच्या विभागामार्फत ज्या योजना राबविण्यात येतात, त्या योजनांचा लाभार्थ्यांना लाभ देण्याचे नियोजन करतांना लाभार्थ्यांकडून आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करुन घ्यावी. ही पुर्तता करतांना लाभार्थ्यांना सहकार्य करावे. प्रत्येक यंत्रणेला लाभार्थ्यांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यंत्रणांकडे काही नव्याने योजना असतील तर त्या योजनेचा लाभार्थ्यांना लाभ देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात येईल. यंत्रणांनी लाभार्थी उद्दिष्टांची माहिती त्वरीत सादर करावी. जिल्हयाच्या ठिकाणी एका निश्चित तारखेला 75 हजार लाभार्थ्यांना एका छताखाली लाभ देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे उपस्थित राहणार असल्याने आतापासूनच लाभार्थ्यांची निवड निश्चित करावी. असे त्यांनी सांगितले.

          यावेळी महसुल, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, गृह विभाग, महिला व बाल कल्याण, पंचायत, आरोग्य, शिक्षण, कृषी, समाज कल्याण, पशुसंवर्धन, कामगार, कौशल्य विकास विभाग, आदिवासी विकास, महावितरण, सहकार, मत्स्य व रेशिम या विभागासह अन्य विभागांनी त्यांच्या विभागामार्फत निवडलेले आणि निवडण्यात येणाऱ्या लाभार्थ्यांची माहिती दिली.

          सभेला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अनंत खेळकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखासकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बाल कल्याण) संजय जोल्हे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे, जिल्हा पशुसंवर्धन उप आयुक्त डॉ. एस.एम. कानफाडे, जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता, कौशल्य विकास विभागाच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज यांचेसह सर्व यंत्रणा प्रमुख, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसिलदार, सर्व गटविकास अधिकारी व सर्व नगर परिषदेचे मुख्याधिकारी उपस्थित होते.     

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे