चना खरेदीचा एसएमएस आल्यासश ेतकऱ्यांनी चना विक्रीसाठी न्यावा
- Get link
- X
- Other Apps
चना खरेदीचा एसएमएस आल्यास
शेतकऱ्यांनी चना विक्रीसाठी न्यावा
वाशिम, दि. 31 (जिमाका) : केंद्र शासनाच्या आधारभुत किंमत खरेदी योजनेअंतर्गत हमी भावाने रब्बी हंगाम 2022-23 या वर्षात चना खरेदी सुरु केली आहे. केंद्र शासनाचे यापुर्वीचे 2 लक्ष 42 हजार 480 क्विंटल चना खरेदीचे उदिष्ट संपल्यामुळे शासनाने आता 84 हजार 66 क्विंटल नवीन चना खरेदीसाठी उदिष्ट वाढवून दिले आहे. ज्या शेतकऱ्यांनी चना या पिकाची ऑनलाईन नोंदणी केली आहे परंतू चना विक्री केलेला नाही, अशा शेतकऱ्यांना सब एजंट संस्थेमार्फत चना खरेदीसाठी एसएमएस देण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन चना खरेदीचे एसएमएस येतील त्या शेतकऱ्यांनी आपला चना त्या त्या खरेदी केंद्रावर विक्रीसाठी घेऊन जावा. शासनाच्या हमी भावाचा लाभ घेण्यासाठी शासनाने दिलेल्या खरेदी कालावधीमध्ये 11 जूनपर्यंत आपला चना नोंदणी केलेल्या खरेदी केंद्रावर एसएमएसनुसार विक्री करावा. असे आवाहन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. आणि जिल्हा पणन अधिकारी, वाशिम यांनी केले आहे.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment