पालकमंत्री संजय राठोड यांनी घेतली शहीद अमोल गोरेच्या कुटूंबियांची सांत्वन भेट
पालकमंत्री संजय राठोड यांनी घेतली
शहीद अमोल गोरेच्या कुटूंबियांची सांत्वन भेट
वाशिम, दि. 12 (जिमाका) : पालकमंत्री संजय राठोड यांनी आज सोनखास येथे शहीद अमोल गोरे यांच्या कुटूंबियांची सांत्वन भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्य शासन आपल्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे आश्वस्त केले. शहीद अमोल गोरेच्या दोन्ही मुलांचा इयत्ता 12 वी पर्यंतचा शैक्षणिक खर्च शासन करणार आहे. राज्य शासनाच्या विविध योजनांच्या लाभ या कुटूंबाला मिळवून देण्यात येईल. वीरपत्नी वैशाली गोरे यांना शासन नियमाप्रमाणे शासकीय सेवेत समावून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. शासनाच्यावतीने जी मदत करता येईल ती सर्व मदत केली जाईल. असे भेटीदरम्यान कुटूंबियांचे सांत्वन करतांना श्री. राठोड यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री श्री. राठोड यांनी विरपत्नी वैशाली गोरे यांना साडीचोळी भेट दिली. पालकमंत्र्याच्या भेटी प्रसंगी जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस. व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत तसेच शहीद अमोल गोरेचे वडील तान्हाजी गोरे, आई मंदाबाई गोरे, वीरपत्नी वैशाली गोरे, भाऊ हनुमान गोरे, बहीण उमेशा भिसडे, संतोष गोरे, शहीद अमोल गोरे यांची दोन्ही लहान मुले व सोनखासच्या सरपंच जयश्री गोरे उपस्थित होत्या.
*******
Comments
Post a Comment