सांडपाणी व घन कचरा व्यस्थापन विषयाचे सरपंच- ग्रामसेवकांचे प्रशिक्षण


सांडपाणी व घन कचरा व्यस्थापन विषयाचे सरपंच- ग्रामसेवकांचे प्रशिक्षण

वाशिम दि. 03 - स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात समाविष्ट ग्रामपंचायतीचे सरपंच व सचिव यांच्या दोन दिवशीय प्रशिक्षणाचा समारोप जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणाचे प्रकल्प संचालक किरण गणेश कोवे यांच्याहस्ते संपन्न झाला.

गावातील घन कचरा व सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठी सरपंच व ग्रामसेवक यांना प्रशिक्षण देण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी दिले होते. त्यानुसार नियोजन भवन येथे दिनांक 2 व 3 मे दरम्यान जिल्हास्तरीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षणाचे उद्घाटन कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती वैभव सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी दिगांबर लोखंडे, कोल्हापुर येथील प्रशिक्षक विद्याधर कुरतडकर, सहायक प्रशासन अधिकारी रविंद्र सोनोने यांची उपस्थिती होती.

*विद्याधर कुरतडकर यांनी केले मार्गदर्शन:*

गावातील घन कचरा व सांडपाणी व्यवस्थापन या विषयाचे मास्टर ट्रेनर कोल्हापुर येथील प्रशिक्ष विद्याधर कुरतडकर यांनी या प्रशिक्षणादरम्यान मार्गदर्शन केले. या क्षेत्रात काम करीत असतांना कचरा व्यवस्थापनाचे महत्व सांगितले. तसेच प्लास्टिक कचरा, ई-कचरा व त्याचे दुष्परिणाम विषद करुन लोकांना विचार करायला भाग पाडले..

दोन्ही दिवसाच्या सर्व सत्राचे संचालन शंकर आंबेकर यांनी प्रास्ताविक प्रफुल्ल काळे यांनी व आभार प्रदर्शन राम श्रृंगारे यांनी केले. कार्यक्रमाला सरपंच संघटनेचे अध्यक्ष राधेशाम गोदारा, जिल्हा कक्षाचे सुमेर चाणेकर, रवि पडघान, प्रदिप सावळकर, अमित घुले अभिजित दुधाटे, पुष्पलता अफुणे, अक्षय मानकर, ओम कुंदर्गे, यांचा तसेच पंचायत समिती स्तरावरील गट समन्वयक गजानन भोयर, सुखदेव पडघान, अभिजित गावंडे, ज्ञानेश्वर महाले, प्रशांत राऊत, अमोल रोकडे आदिंची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे