वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक व्यक्तीचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यासाठी प्रयत्न करा - विभागीय आयुक्त पियुष सिंह
·
मतदार यादी पुनरीक्षण
कार्यक्रमाचा आढावा
·
महिला मतदारांची संख्या
वाढविण्यासाठी प्रयत्न करा
·
दि. २२ व २९ ऑक्टोबर
रोजी विशेष मोहीम राबविली जाणार
वाशिम, दि. १२ : राज्यात
दि. १ जानेवारी २०१८ या अर्हता दिनांकवर आधारित मतदार याद्यांचा विशेष पुनरीक्षण
कार्यक्रम दि. ३ ऑक्टोंबर ते दि. ३ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत होते आहे. या
कार्यक्रमांतर्गत वाशिम जिल्ह्यातील वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक
व्यक्तीचे नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना विभागीय
आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक पियुष सिंह यांनी दिल्या. जिल्हाधिकारी
कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
याप्रसंगी
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्यासह उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील कोरडे, उपजिल्हाधिकारी
दिनेशचंद्र वानखेडे, वाशिमचे उपविभागीय अधिकारी अभिषेक देशमुख व सर्व तहसीलदार उपस्थित होते.
विभागीय
आयुक्त श्री. सिंह म्हणाले की, मतदार याद्यांमध्ये पुरुष व महिला मतदारांचे लिंग गुणोत्तर
प्रमाण हे जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या लिंग गुणोत्तर प्रमाणा इतके राहील, याची
दक्षता घ्यावी. यासाठी महिला मतदारांची नोंदणी करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. तसेच
मतदार यादीमध्ये समाविष्ट असलेली मयत मतदार, दुबार नाव नोंदणी असलेले मतदार व
स्थलांतरित मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्याची कार्यवाही सुद्धा या दरम्यान
करणे आवश्यक आहे. ही कार्यवाही करताना योग्य ती शहानिशा केल्यानंतरच मतदारांची
नावे वगळावी.
मतदार
याद्यांचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम अंतर्गत दि. ८ व २२ ऑक्टोंबर २०१७ रोजी मतदार
नोंदणीसाठी विशेष मोहीम राबविण्याच्या निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत. मात्र
ग्रामपंचायत निवडणुकीमुळे दि. ८ ऑक्टोंबर २०१७ रोजी नागरिकांचा अल्प प्रतिसाद
मिळाला आहे. तसेच दि. २२ ऑक्टोंबर २०१७ रोजी दीपावली सण असल्याने आता या दोन दिवसांबरोबरच
दि. २९ ऑक्टोंबर २०१७ रोजी सुध्दा मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार
आहे. तरी या दिवशी जास्तीत जास्त नवीन मतदारांची नोंदणी होईल, यासाठी प्रयत्न
करण्याच्या सूचनाही विभागीय आयुक्तांनी यावेळी दिल्या.
यावेळी
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी यांनी मतदार यादी पुनरीक्षण
कार्यक्रम विषयी माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की, जिल्ह्यातील तीन विधानसभा
मतदार संघातील सर्व १०४० मतदान केंद्रांवर मतदान यादी पुनरीक्षण कार्यक्रम अंतर्गत
कामासाठी मतदान केंद्र स्तरीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच
मतदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक
विभागात तक्रार निवारण केंद्राची स्थापना करण्यात आली असून या केंद्रातील दूरध्वनी
क्रमांक ०७२५२- २३३८५२ वर मतदारांच्या तक्रारी स्वीकारून त्याचे निराकरण केले जात
आहे. तसेच मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाविषयी नागरिकांना माहिती देण्यासाठी
जनजागृती केली जात असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
*****
Comments
Post a Comment