शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यास बुधवारपासून प्रारंभ


·        कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांचा पालकमंत्र्याच्या हस्ते होणार सत्कार  
वाशिमदि१६ :  राज्य शासनाने घोषित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत ऐतिहासिक महाकर्जमाफीच्या निर्णयानुसार पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीस बुधवार, दि. १८ ऑक्टोंबर २०१७ पासून प्रारंभ होत आहे. यानिमित्ताने दि. १८ ऑक्टोंबर रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य सभागृहात आयोजित कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील कर्जमाफीस पात्र ठरलेल्या निवडक ५० शेतकऱ्यांचा प्रातिनिधिक स्वरुपात पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते कर्जमाफीचे प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात येणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक  सहकारी संस्था कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
कर्जमाफीच्या प्रारंभानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहामध्ये मुख्य कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात प्रत्येक जिल्ह्यातील निवडक दोन शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्याच्या हस्ते कर्जमाफीचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर आयोजित कार्यक्रमात मुंबई येथील कार्यक्रमाचे थेट प्रेक्षपण दाखविले जाणार आहे. तसेच कर्जमाफीस पात्र ठरलेल्या प्रत्येक तालुक्यातील निवडक शेतकऱ्यांचा प्रातिनिधिक स्वरुपात जिल्हास्तरीय कार्यक्रमात पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्वाक्षरी असलेले कर्जमाफीचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार श्रीकांत देशपांडे, आमदार लखन मलिक, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी कळविले आहे

Comments

  1. सामान्य गरीब शेतकरी पांडुरंग बनसोड माझ्याकडे ५४आर शेती आहे पंतप्रधान योजनेची विहीर आनुदान चार वर्षा पासुन मिळत नाही विनंती मंजुर करावी

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे