‘रन फॉर युनिटी’ दौडला वाशिमकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
·
विद्यार्थी,
नागरिकांचा सहभाग
·
जिल्हाधिकाऱ्यांनी
दिली राष्ट्रीय एकतेची शपथ
वाशिम, दि. ३१ : सरदार वल्लभभाई पटेल
यांच्या जयंती दिवस हा ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त
आज वाशिम जिल्हा प्रशासन व विविध सामाजिक संघटनांच्यावतीने ‘रन फॉर युनिटी’चे
आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थी, नागरिकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग
नोंदविला. सर्वप्रथम
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकतेची शपथ दिली.
याप्रसंगी जिल्हा
परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा
पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रियांका मीना, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अरुण
राऊत, शिक्षणाधिकारी अंबादास मानकर, जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य आर. एस.
चंदनशिव, पोलीस उपाधीक्षक श्री. धात्रक, मारवाडी युवा मंचचे मनीष मंत्री, क्रीडा
संघटनेचे धनंजय वानखेडे आदी उपस्थित होते.
जिल्हा पोलीस अधीक्षक
मोक्षदा पाटील यांनी हिरवी झेंडी दाखविल्यानंतर सकाळी ८ वाजता दौड सुरु झाली. यावेळी
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी स्वतः दौडमध्ये धावण्यासाठी नागरिकांमध्ये सहभागी झाले.
जिल्हा क्रीडा संकुल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पाटणी चौक, अकोला नाका, जिल्हा
सामान्य रुग्णालयमार्गे पुन्हा जिल्हा क्रीडा संकुल येथे आल्यानंतर दौडचा समारोप
झाला. यावेळी दौडमध्ये सहभागी झालेले विद्यार्थी, नागरिकांसोबत जिल्हाधिकाऱ्यांनीही
दौडचे सुमारे ५ किलोमीटर अंतर धावून दौड पूर्ण केले. दौडमध्ये विद्याथी, नागरिक
यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, विविध क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
जिल्ह्यातील
सामाजिक संघटनांचा सहभाग
‘रन फॉर युनिटी’ दौडसाठी
अखिल भारतीय मारवाडी युवा मंच, व्यापारी मंडळ, रोटरी क्लब, वाशिम मेडिकल असोसिएशन,
सिंधी समाज, माळी युवा मंच, लायन्स क्लब, राजपूत संघटन, जे.सी. आय., छत्रपती
शिवाजी रायडर्स फौंडेशन, दिगंबर जैन सोशल ग्रुप आदी सामाजिक संघटनांनी विशेष सहकार्य
केले. या संघटनांच्यावतीने दौडमध्ये सहभागी धावपटूंना पाटणी चौक, अकोला नाका येथे
पाणी वाटप करण्यात आले. तसेच दौडचा समारोप झाल्यानंतर सहभागी धावपटूंना जिल्हा
क्रीडा संकुल येथे अल्पोपहार देण्यात आला.
*****
Comments
Post a Comment