जनगणना प्रक्रियेत नागरिकांनी सक्रीय सहभाग घेवूनस्व-गणना सुविधेचा लाभ घ्यावा : जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन


जनगणना प्रक्रियेत नागरिकांनी सक्रीय सहभाग घेवून

स्व-गणना सुविधेचा लाभ घ्यावा : जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

        वाशिम, दि.३० एप्रिल (जिमाका) जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात दि.१ ते १५ मे २०२६ या कालावधीत नागरिकांना ऑनलाईनरित्या स्व-गणना करता येणार असून या स्व-गणनेत नागरिकांना स्वतः सह कुटुंबांची माहिती भरता येणार आहे. त्यामुळे जनगणना-२०२७ प्रक्रियेत नागरिकांनी सक्रीय सहभाग घेवून स्व-गणना सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे.

यासाठी भारत सरकारच्या https://se.census.gov.in या संकेतस्थळावर भेट देवून आपल्या मोबाईल क्रमांकाद्वारे लॉगीन करावे. त्यानंतर लोकेशन समाविष्ट करुन कुटुंबाबाबत विचारण्यात येणाऱ्या सर्व प्रश्नांची माहिती भरणे आवश्यक आहे. ही माहिती भरल्यानंतर त्याचा ११ अंकी एस ई क्रमांक तयार झाल्यानंतर तो जतन करुन ठेवावा. हा ११ अंकी क्रमांक दि.१५ मे २०२६ नंतर घरभेटीसाठी येणाऱ्या प्रगणकाला देवून जनगणना प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

जनगणना मोहिमेतील स्व-गणना प्रक्रिया सुरक्षित, सुलभ व सोईस्कर आहे. जनगणनेचे संकेतस्थळ इंग्रजी, हिंदी, मराठी आणि इतर प्रादेशिक भाषेमध्ये उपलब्ध आहे. स्व-गणना प्रक्रियेत माहिती अचूक नोंदविण्यासाठी नागरिकांनी आपल्या सोयीस्कर व समजणाऱ्या भाषेचा वापर करावा. या मोहिमेत नागरिकांनी सक्रीय सहभाग घेवून स्व-गणना सुविधेचा लाभ घ्यावा.तसे घरी येणाऱ्या प्रगणकाला सहकार्य करावे असे आवाहनही करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वाशिम जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यान्वित