जिल्हा न्यायालय येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा
- Get link
- X
- Other Apps
जिल्हा न्यायालय येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा
वाशिम, दि. 22 (जिमाका) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधिज्ञ संघ,वाशिमच्या वतीने 21 जून रोजी जिल्हा न्यायालयात आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे आयोजन करण्यात आले.अध्यक्षस्थानी जिल्हा व सत्र न्यायाधिश अमोघ कलोती होते.योग प्रशिक्षक संतोष भारसाकळे यांनी प्रात्याक्षिकाव्दारे योगाचे महत्व उपस्थितांना सांगून योगाचे प्रशिक्षण दिले.यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव,जिल्हा न्यायालयातील न्यायीक अधिकारी, विधिज्ञ मंडळी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार श्रीमती हर्षा बारड यांनी मानले.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment