अवैध उत्खनन व वाहतूक प्रकरणी 25 वाहनांवर कारवाई 51 लक्ष 16 हजार 831 रुपये दंड आकारला
अवैध उत्खनन व
वाहतूक प्रकरणी 25 वाहनांवर कारवाई
51 लक्ष 16
हजार 831 रुपये दंड आकारला
वाशिम, दि. 10 (जिमाका) : जिल्ह्यातील गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतूकीस
प्रभावीरित्या आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी जिल्हास्तरावर
तीन, उपविभागीयस्तरावर तीन आणि तालुकास्तरावर सहा असे भरारी पथक नियुक्त केले आहे.
यामध्ये एकूण 58 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. नियुक्त करण्यात आलेल्या
भरारी पथकांकडून तसेच जिल्हयातील महसूल अधिकाऱ्यांकडून 1 एप्रिल ते 9 जून या
कालावधीत गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात आली. तपासणी
दरम्यान तपासणी करण्यात आलेल्या वाहनांपैकी अवैध वाहतूक करतांना आढळलेल्या एकूण 25
वाहनांवर 51 लक्ष 16 हजार 831 रुपये दंड आकारण्यात आला. यामधून 48 लक्ष 8 हजार 263
रुपये स्वामित्व धनाची वसूली करण्यात येऊन ती शासन जमा करण्यात आली. जिल्हयात
यापुढेही अवैध गौण खनिजाची वाहतूक व उत्खनन तपासणी मोहिम अधिक तीव्र करण्यात येऊन
अवैध गौण खनिजाची वाहतूक व उत्खनन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची
माहिती जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. विनय राठोड यांनी दिली.
*******
Comments
Post a Comment