26 जून रोजी सामाजिक न्याय दिनाचे आयोजन
26 जून रोजी सामाजिक न्याय दिनाचे आयोजन
वाशिम, दि.24 (जिमाका) : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा 26 जून हा जन्मदिवस सामाजिक न्याय दिन म्हणून या वर्षीही सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने 26 जून 2022 रोजी सकाळी 8 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळयास अभिवादन करून पुष्पहार अर्पण करुन या चौकातून समता दिंडी काढण्यात येणार आहे. ही दिंडी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे येऊन त्याठिकाणी मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त, मारोती वाठ यांनी कळविले आहे.
***
Comments
Post a Comment