23 जून रोजी ऑलिम्पिंक दिनाचे आयोजन
23 जून रोजी ऑलिम्पिंक दिनाचे आयोजन
वाशिम,दि.22 (जिमाका) : जिल्हा क्रीडा कार्यालय येथे 23 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिंक दिवस म्हणून विविध माध्यमातून साजरा करण्यात येणार आहे. 23 जून 1894 रोजी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिंक समितीची स्थापना करण्यात आली. या दिवसाचे स्मरण म्हणून हा दिवस आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिंक दिवस म्हणून साजरा केला जातो.जगभरातील खेळाडूंना सर्वोत्कृष्ठ बनविण्यासाठी प्रोत्साहन देण्यास प्रवृत्त करण्यासाठी ऑलिम्पिंक दिवस साजरा करण्यात येतो. राज्यात या दिवसाचे महत्व जागविण्यासाठी व राज्यातील खेळाडूंना आकर्षित करण्यासाठी क्रीडाविषयक वातावरण निर्मित्ती करणे व क्रीडाविषयक संवर्धन करण्यासाठी 23 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिंक दिवस म्हणून जिल्हयात साजरा करण्यात येत आहे. ऑलिम्पिंक दिवसाचे महत्व ओळखून क्रीडा विषयक प्रात्याक्षिके, खेळाडूंचा सत्कार, परिसंवाद, खेळातील फिजीओथेरिपीचे महत्व इत्यादी उपक्रमाचे आयोजन 23 जून रोजी जिल्हा क्रीडा संकुल वाशिम येथे दुपारी 12 वाजता करण्यात आले आहे.असे जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता यांनी कळविले आहे
*******
Comments
Post a Comment