पीसीपीएनडीटी कार्यक्रम खबरी व्यक्तीला मिळाले १ लाख रुपये बक्षीस रक्कम

पीसीपीएनडीटी कार्यक्रम 

खबरी व्यक्तीला मिळाले १ लाख रुपये बक्षीस रक्कम 

वाशिम दि.२८(जिमाका) गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र लिंग निवडीस प्रतिबंध कायदा (पीसीपीएनडीटी) या कार्यक्रमांतर्गत १८ ऑगस्ट २०२१ रोजी वाशीम येथील डॉ.सारसकर हॉस्पिटलमध्ये अवैधरित्या गर्भपात करीत असल्याची गोपनीय माहितीची तक्रार एका खबरी व्यक्तीने ८४५९८१४०६० या भ्रमणध्वनीवर केली होती.या तक्रारीची तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ मधुकर राठोड यांनी तात्काळ दखल घेऊन तपासणीसाठी सारसकर हॉस्पिटल येथे वैद्यकीय पथकाला सोबत घेऊन धाड टाकली होती.धाडी दरम्यान डॉ. सारसकर आणि बोगस डॉ. विलास ठाकरे यांना रंगेहात अवैधरित्या गर्भपात करताना पकडण्यात आले होते. सदर गोपनीय माहिती देणाऱ्या खबरी व्यक्‍तीस १ लाख रुपये शासनाने दिले आहे.
          तत्कालीन समुचित प्राधिकारी डॉ.मधुकर राठोड यांनी डॉ सारसकर आणि बोगस डॉ.विलास ठाकरे यांचेविरुद्ध प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करून डॉ सारसकर व बोगस डॉ.विलास ठाकरे यांना अटक केली होती.त्यांच्यावर न्यायालयीन कारवाई सुरू आहे. 
           जिल्ह्यात अवैधरित्या गर्भपात आणि गर्भलिंग निदान चाचणी होत असल्याची माहिती असल्यास गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र लिंग निवडीस प्रतिबंध कायदा कार्यक्रमांतर्गत गोपनीय तक्रार ८४५९८१४०६० या भ्रमणध्वनी क्रमांकावर द्यावी.डॉ. सारसकर हॉस्पिटल येथील अवैध गर्भपात प्रकरणी गोपनीय माहिती देणाऱ्या व्यक्तीस खबरी योजनेतून १ लाख रुपये रक्कम सदर व्यक्तीच्या बँक खात्यात राज्यस्तरावरून जमा करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक,वाशिम यांनी दिली.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे