ऑलिंपिक दिन उत्साहात साजरा



ऑलिंपिक दिन उत्साहात साजरा

        वाशिम, दि.24 (जिमाका) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय,वाशिम येथे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन विविध माध्यमातून साजरा करण्यात आला. २२ जुन १८९४ साली आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिंक समितीची स्थापना झाली. या दिवसाचे स्मरण म्हणून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिंक दिन साजरा केला जातो. जगभरातील खेळाडूंना सर्वोत्कृष्ठ बनविण्याच्या हेतुने प्रोत्साहन देऊन प्रवृत करण्यासाठी ऑलिम्पिक डे साजरा करण्यात येतो.

           जिल्हा क्रीडा संकुल येथे २३ जुन रोजी जागतिक ऑलिम्पिक दिन साजरा करण्यात आला. ऑलिम्पिंक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षतेस्थानी जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती लता गुप्ता ह्या होत्या.प्रमुख पाहुणे म्हणुन योग चिकित्सक,आयुष विभाग तेजस्विनी माणिकराव,राज्य क्रीडा मार्गदर्शक किशोर बॉडे, बालाजी शिरसीकर, आर्चरी संघटना उज्वला डुडुल, राजुभाऊ सांगळे, कराटे संघटना सुनिल देशमुख, रायफल शुटींग प्रल्हाद आळणे, क्रीकेट विक्की खोबरागडे, किक बॉक्सींगचे रणजित कथडे आदी उपस्थित होते.

           सुरुवातीला बालाजी शिरसीकर यांनी क जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती लता गुप्ता यांचे स्वागत .केले.तसेच उपस्थित सर्व पाहुण्याचे देखील स्वागत केले. श्रीमती लता गुप्ता यांनी ऑलिम्पीक दिनानिमित्ताचे खेळाडूंना माहिती दिली.योग चिकित्सक आयुष विभाग तेजस्विनी माणिकराव यांनी खेळाडूंना आरोग्य विषय, खेळाडूंच्या आहारविषयक तसेच खेळाडूंना इजा झाल्यास कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी याबाबतची माहिती दिली. तसेच खेळाडुंना सरावापूर्वी कोणत्या प्रकारचे व्यायाम करावयाचे त्याचे महत्व पटवून दिले.राज्य क्रीडा मार्गदर्शक किशोर बोंडे यांनी खेळाडूंनी खेळाचा सरावाच्या दरम्यान घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले.खेळाडूंच्या कोणत्या प्रकारच्या सरावादरम्यान अडचणी आल्यास त्यांची विचारणा केली. श्रीमती गुप्ता यांनी देखील खेळाडूंना खेळासंबंधी माहिती देऊन खेळाडूंना प्रोत्साहित केले.

           जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व विविध खेळ संघटनाच्या माध्यमाने २३ जून रोजी आर्चरी, कबड्डी, किक बॉक्सींग, शुटींग, कराटे, क्रीकेट इत्यादी स्पर्धा, प्रात्यक्षिक, व्याख्यान, चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले. यावेळी उत्कृष्ट खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. राज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकर यांनी उपस्थित सर्व पाहुण्यांचे आभार मानले. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिंक दिन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील क्रीडा अधिकारी संजय पांडे, मिलींद काटोलकर, राज्य क्रीडा मार्गदर्शक किशोर बोंडे,बालाजी शिरसीकर शुभम कंकाळ, भारत वैद्य, कलीम वेग मिर्झा यांनी परिक्षम घेतले.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे