२० जून रोजी महिला लोकशाही दिन

२० जून रोजी महिला लोकशाही दिन

           वाशिम, दि. १७ (जिमाका) : जिल्ह्यातील समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या तक्रारी व अडचणींची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. जर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी सुट्टी असेल तर त्यानंतर येणाऱ्या कामकाजाच्या दिवशी जिल्हास्तरीय महिला लोकशाही आयोजित करण्यात येतो. या महिन्यात जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन हा २० जून 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. असे प्रभारी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आलोक अग्रहरी यांनी कळविले आहे.

*******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश