सामाजिक न्याय दिवस उत्साहात साजरा
सामाजिक न्याय दिवस उत्साहात साजरा
*गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार*
*समता दिंडीचे आयोजन*
वाशिम,दि.२६ (जिमाका) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या समाज कल्याण,सहायक आयुक्त कार्यालय,वाशिमच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा 26 जून हा जन्म दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत गोपाळराव आटोटे होते. प्रमुख पाहुणे म्हणून अंनिसचे कार्याध्यक्ष पी.एस.खंदारे, शिवमंगल आप्पा राऊत,सु.ना.खंडारे, लोककलावंत संतोष खडसे,अविनाश कांबळे,अनंत जुमडे,सरस्वती समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.जमदाडे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मारोती वाठ यांनी पूष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
याप्रसंगी सामाजिक समता दिंडीचे आयोजन करण्यात आले.माँ गंगा नर्सींग कॉलेज, गुणवंत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह,मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह,समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच इतर कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी बहुसंख्येने सहभागी झाले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते सामाजिक न्याय विभागांतर्गत अधिनस्त असलेल्या अनु. जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा सुरकुंडी,येथील निवासी शाळेतून राज्यात प्रथम आलेली रुपाली सभादिंडे, द्वितीय गायत्री सरदार, तृतीय ममता तायडे यांना तसेच अनु.जाती व नवबौद्ध मुलांचे शासकीय निवासी शाळा सवड येथील शाळेमधून प्रथम आलेले कार्तीक नागरे,प्रणव भाग्यवंत,अनु. जाती व नवबौद्ध मुलांचे शासकीय निवासी शाळा तुळजापूर येथील शाळेमधून प्रथम आलेले रोषन कंकाळ,मुलांचे शासकीय वसतीगृह सवड वसतीगृहामधून प्रथम आलेले यश शिरसाट,आकाश पारडे,मुलांचे शासकीय वसतीगृह मंगरुळपीर वसतीगृहातून प्रथम विनय पवार, मुलींचे शासकीय वसतीगृह मंगरुळपीर या वसतीगृहामधून प्रथम सांची गायकवाड, मुलींचे शासकीय वसतीगृह वाशिम येथून दिव्या भगत, मुलांचे शासकीय वसतीगृह कारंजा येथून अक्षय घोडराव या सर्व विद्यार्थी-विदयार्थीनींना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देवून मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
सु. ना.खंडारे,शिवमंगल आप्पा राउत,शाहीर अविनाश कांबळे, अनंत जुमडे यांनी शाहू महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकला.संतोष खडसे यांनी गीतगायनामधून शाहू महाराजांच्या कार्याची महती विशद केली.
श्री.आटोटे म्हणाले,शाहू महाराज हे कृतीशील राजे होते.महाराजांनी मागासवर्गीयांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची सुरूवात केली.त्यांनी शिक्षणाशिवाय समाजाचा विकास होत नाही असे विचार जनमानसात रुजवले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती,श्री. रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय व श्री. सरस्वती समाजकार्य महाविद्यालय,माँ गंगा नर्सींग महाविद्यालयाच्या विद्यार्थीनी,प्राध्यापक,शिक्षक, कर्मचारी,सर्व महामंडळे,निवासी शाळेचे मुख्याध्यापक,गृहपाल, सहाय्यक शिक्षक, जिल्हयातील समतादूत, तालुका समन्वयक तसेच ब्रिक्स, बी.व्ही.जी. व क्रीस्टल कंपनीचे बाह्यस्त्रोत कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे संचालन हरीष वानखेडे यांनी केले.आभार श्रीमती संध्या राठोड यांनी मानले .
Comments
Post a Comment