तुळजापूर येथे शासकीय वसतीगृह प्रवेशविद्यार्थ्यां कडून 25 जूनपर्यंत अर्ज मागविले
- Get link
- X
- Other Apps
तुळजापूर येथे शासकीय वसतीगृह प्रवेश
विद्यार्थ्यांकडून 25 जूनपर्यंत अर्ज मागविले
वाशिम, दि. 15 (जिमाका) : मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह, तुळजापूर, ता. मंगरुळपीर येथे सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाकरीता रिक्त असलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, आर्थिकदृष्टया मागास प्रवर्ग, अनाथ, अपंग व विशेष मागास प्रवर्ग इत्यादीच्या जागा वर्गवारीमधून भरण्यात येणार आहे. चालू शैक्षणिक वर्ष 2022-23 करीता वर्ग 8 वी व व्यावसायीक पदवी प्रथम वर्षाच्या मुलांसाठी प्रवेश अर्जाचे वसतीगृहात दररोज वाटप सुरु आहे. वसतीगृह प्रवेश अर्ज भरुन सादर करण्याची शेवटची तारीख 25 जून 2022 आहे. तरी मंगरुळपीर येथे शिकत असलेल्या ज्या विद्यार्थ्यांना वसतीगृहात राहून पुढील शिक्षण घ्यावयाचे आहे त्या विद्यार्थ्यांनी वसतीगृहामधून प्रवेश अर्ज प्राप्त करुन 25 जून 2022 पूर्वी वसतीगृहात सादर करावे. काही अपरीहार्य कारणास्तव प्रवेश अर्ज सादर करण्याच्या तारखेत बदल होऊ शकतो. प्रवेश अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रिका, सक्षम अधिकाऱ्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र, तहसिलदाराचा उत्पन्नाचा दाखला, सरपंच किंवा पोलीस पाटील यांचा रहिवाशी दाखला आणि प्रवेशीत असलेले शाळेचे/महाविद्यालयाचे बोनाफाईड सर्टीफिकेट आदी प्रमाणपत्राच्या छायाप्रती साक्षांकित करुन जोडाव्यात. असे गृहपाल, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह, तुळजापूर यांनी कळविले आहे.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment