शासकीय मत्स्यबीज उत्पादन केंद्रात कार्प प्रजातीचे मत्स्यबीज उपलब्ध
शासकीय
मत्स्यबीज उत्पादन केंद्रात
कार्प प्रजातीचे मत्स्यबीज उपलब्ध
वाशिम, दि. 10 (जिमाका)
: जिल्हयातील मत्स्यबीज संचयनांची आकडेवारी वाढवून व इष्टत्तम
प्रमाणात मत्स्यबोटूकली संचयन करुन भरघोस मत्स्योत्पादन घेण्याच्या दृष्टीने जिल्हयातील
सर्व मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था, खाजगी मत्स्यसंवर्धक व शेततळीधारक शेतकऱ्यांनी
शासकीय मत्स्यबीज उत्पादन केंद्र, काटेपूर्णा, ता. बार्शिटाकळी जि. अकोला/ शासकीय
मत्स्यबीज उत्पादन केंद्र, इसापूर, जि. यवतमाळ/ शासकीय मत्स्यबीज उत्पादन केंद्र,
कोराडी, ता. मेहकर जि. बुलडाणा येथून पावसाळी हंगामात भारतीय प्रमुख कार्प
प्रजातीचे मत्स्यबीज खरेदी करुन आपल्याकडे ठेक्याने असलेल्या तलावात/ जलाश्यात व
शेततळयामध्ये तसेच खाजगी मत्स्यसंवर्धन तळी/ तलावामध्ये मत्स्यबीज संचयन करावे.
असे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाचे, सहाय्यक आयुक्त श्री. जयस्वाल यांनी केले आहे.
*******
Comments
Post a Comment