जिल्हा न्यायालयात मध्यस्थीबाबत जनजागृती शिबीर संपन्न
- Get link
- X
- Other Apps
जिल्हा न्यायालयात
मध्यस्थीबाबत जनजागृती शिबीर संपन्न
वाशिम, दि.२३ (जिमाका) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधिज्ञ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने १८ जून रोजी जिल्हा न्यायालय येथे मध्यस्थीबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. न्या आर. पी. कुलकर्णी यांनी प्रकरणांची श्रेणी येथे मध्यस्थी योग्य आहे आणि मध्यस्थी प्रक्रीया या विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले. प्रशिक्षित मध्यस्थ अॅड. पी. एस. देशमुख यांनी मध्यस्थीचा आधार आणि त्याचे फायदे याबाबत महत्वपूर्ण माहिती दिली.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अमोघ कलोती यांनी अध्यक्षीय भाषणातून सद्यःस्थितीत 'मध्यस्थी' या पर्यायाची सर्व खटल्यांमध्ये अंमलबजावणी करण्याबाबत उपस्थितांना आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व्ही. ए. टेकवाणी यांनी केले. संचालन श्रीमती हर्षा बारड यांनी केले. आभार जिल्हा विधिज्ञ मंडळाचे सचिव अॅड. ए. पी. वानरे यांनी मानले. कार्यक्रमास सर्व न्यायीक अधिकारी, विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष,सदस्य गण,कर्मचारी व पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment