वाशिम व मंगरुळपीर शासकीय वसतीगृह प्रवेश विद्यार्थीनींकडून 22 जूनपर्यंत अर्ज मागविले

 

वाशिम व मंगरुळपीर शासकीय वसतीगृह प्रवेश

विद्यार्थीनींकडून 22 जूनपर्यंत अर्ज मागविले

         वाशिम, दि. 10 (जिमाका) :  मागासवर्गीय व आर्थिकदृष्टया मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह सिव्हील लाईन, वाशिम आणि मंगरुळपीर येथील वसतीगृहामध्ये विद्यार्थिनींना जातीनिहाय रिक्त असलेल्या जागेवर गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येणार आहे. इयत्ता 8 वीच्या वसतीगृह प्रवेशाच्या अटी व पात्रता पुढीलप्रमाणे आहे. विद्यार्थीनी ही वाशिम जिल्हयाची रहिवाशी असावी. वसतीगृहामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थीनी अनुसूचित जाती 80 टक्के व इतर 20 टक्केमध्ये अनुसूचित जमाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, आर्थिक दृष्टया मागास प्रवर्ग या संवर्गामध्ये मोडणाऱ्या असाव्यात. विद्यार्थिनींनी अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रिका, सक्षम अधिकाऱ्याने दिलेल जातीचे प्रमाणपत्र, तहसिलदाराचा उत्पन्नाचा दाखला, सरपंच किंवा पोलीस पाटील यांचा रहिवाशी दाखला आदी प्रमाणपत्राच्या छायाप्रती साक्षांकित करुन जोडाव्यात.

              प्रवेशित विद्यार्थिनींना शासकीय नियमानुसार विनामुल्य भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य पुरविण्यात येईल. प्रवेश अर्ज कार्यालयीन वेळेत विनामुल्य मिळतील. इयत्ता 8 व्या वर्गातील विद्यार्थिनींच्या वसतीगृह प्रवेशासाठी अर्जाचे वाटप सुरु आहे. प्रवेश अर्ज भरुन 22 जूनच्या आत गृहपाल, मागासवर्गीय व आर्थिकदृष्टया मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह, सिव्हील लाईन, वाशिम व मंगरुळपीरल येथे कार्यालयीन वेळेत सादर करावे.  

*******


Comments

Popular posts from this blog

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वाशिम जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यान्वित