वांगी येथे बीज प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन

वांगी येथे बीज प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन 

वाशिम दि.१८(जिमाका) खरीप पीक लागवड व पेरणीच्या पार्श्वभूमीवर जिल्हयात कृषी विभागाकडून बीज प्रक्रिया मोहिम राबविण्यात येत आहे. बीजप्रक्रिया मोहिमेमध्ये  राज्य पुरस्कृत सोयाबीन मूल्य साखळी विकास प्रकल्पांतर्गत वाशिम तालुक्यातील मौजे वांगी येथे १७ जून रोजी शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाला वांगीच्या सरपंच अर्चना भोयर, उपसरपंच सविता भोयर, ग्रामपंचायत सदस्य माधव भोयर, बालाजी भोयर, सतीश भोयर,वाशिम तालुका कृषी अधिकारी अनिल कंकाळ, मंडळ कृषी अधिकारी उमेश राठोड, कृषी पर्यवेक्षक सुनील वाळूकर,तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जयप्रकाश लव्हाळे, कृषी सहाय्यक नागेश हातोलकर, गजानन नरवाडे, संजय कुटे, बाळू इंगळे प्रामुख्याने उपस्थित होते.
    कार्यक्रमामध्ये मंडळ कृषी अधिकारी उमेश राठोड यांनी आपल्या प्रास्ताविकात प्रकल्पाबाबत माहिती देऊन प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या विविध बाबींविषयी विस्तृत माहिती दिली व शेतकऱ्यांना योजनेमध्ये अनुदान घेण्यासाठी कोणकोणत्या बाबीं केल्या पाहिजे याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले.
        तालुका कृषी अधिकारी श्री.कंकाळ यांनी आपल्या मार्गदर्शनात शेतकऱ्यांनी पुरेसा ओलावा जमिनीत असल्याशिवाय पेरणी करू नये तसेच पेरणी करताना जास्त खोलवर बियाणे पडणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच बीजप्रक्रिया करून व उगवणशक्ती तपासणी करूनच शेतकर्‍यांनी पेरणी करावी याबाबत आवाहन केले. तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री. लव्हाळे यांनी बीज प्रक्रिया मोहीम याबाबत माहिती देऊन महिला बचतगट यांना संपूर्ण गावामध्ये बीज प्रक्रिया मोहीम राबविणे विषयी मार्गदर्शन केले तसेच गटाची उत्पादन वाढीकरिता आपण रास्त दरात गावातील शेतकऱ्यांची बीजप्रक्रिया करून द्यावी ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादनही या गोष्टीमुळे वाढणार आहे त्याचबरोबर गटाचेही उत्पन्न वाढीकरिता महिला बचतगटांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही मोहीम पोहोचविण्य विषयी मार्गदर्शन केले.
           खाजगी कंपनी प्रतिनिधी श्री सरनाईक यांच्याद्वारे बीज प्रक्रिया  प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. गावातील बहुसंख्य शेतकरी तसेच
प्रतिष्ठित नागरिक पांडुरंग भोयर, भागवत भोयर,जनार्धन भोयर,मोहन भोयर, भागवत देवळे, माणिक ठाकरे दत्ता घाटफोडे व रमेश जाटे उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषी पर्यवेक्षक सुनील वाळूकर, कृषी सहाय्यक गजानन नरवाडे,नागेश हातोलकर, संजय कुटे,बाळू इंगळे   ग्रामसेवक पुरुषोत्तम राऊत यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे