दुकानांचे नामफलक मराठीत असणे अनिवार्य अन्यथा आस्थापना मालकांविरुध्द कारवाई

 

दुकानांचे नामफलक मराठीत असणे अनिवार्य

अन्यथा आस्थापना मालकांविरुध्द कारवाई

                         

वाशिम, दि. 10 (जिमाका) : प्रत्येक दुकानाचे नामफलक सुरुवातीला मराठीत नाव असणे अनिवार्य असलेल्या तरतुदीच्या अधिनियमात सुधारणा करण्यात आली आहे. अधिनियमाच्या कलम 7 अन्वये ज्या आस्थापनेत 10 पेक्षा कमी कामगार आहे अशा सर्व आस्थापनांना कलम 6 अन्वये नोंदणी केलेल्या प्रत्येक आस्थापनेत 10 पेक्षा अधिक कामगार आहे अशा सर्व आस्थापनेचे नामफलक देवनागरी लिपीतील मराठी भाषेमध्ये असावे. मराठी भाषेतील अक्षर लेखन नामफलकावर सुरुवातीलाच लिहीणे आवश्यक आहे. मराठी भाषेतील अक्षरांचा आकार इतर कोणत्याही भाषेतील अक्षरांच्या फॉन्टपेक्षा लहान असणार नाही. तसेच ज्या आस्थापनांमध्ये मद्य पुरविले जाते किंवा विकले जाते अशा आस्थापनांच्या नामफलकावर महान व्यक्तींची किंवा गडकिल्ल्यांची नावे लिहिण्यात येऊ नये. वाशिम शहरात ज्या आस्थापनेचे नामफलक अन्य भाषेत प्रदर्शित केल्याचे सरकारी कामगार अधिकारी व दुकाने निरीक्षक यांच्या निदर्शनास आलेल्या अशा आस्थापनांना भेट देऊन अधिनियमांच्या तरतुदीनुसार बदल करण्याबाबत नोटीस बजावण्यात आल्या आहेत. तरी वाशिम जिल्हयातील सर्व आस्थापना मालकांनी दुकानाचे नामफलक मराठीत असणे अनिवार्य केल्याच्या तरतुदीचे तंतोतंत पालन करावे. तरतुदीचा भंग करणाऱ्या आस्थापना मालकांविरुध्द कारवाई करण्यात येईल. असे सरकारी कामगार अधिकारी गौरवकुमार नालिंदे यांनी कळविले आहे. 

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे