सवड शासकीय वसतीगृह प्रवेश विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविले

 

सवड शासकीय वसतीगृह प्रवेश

विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविले

                         

वाशिम, दि. 10 (जिमाका) : रिसोड तालुक्यातील सवड येथील मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतीगृहाच्या शैक्षणिक वर्ष 2022-23 करीता प्रवेश अर्ज प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे. मागासवर्गीय प्रवर्गनिहाय रिक्त असणाऱ्या आरक्षित टक्केवारीनुसार समाजातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, आर्थिकदृष्टया तसेच इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, अपंग व अनाथ आदी प्रवर्गातील विद्यार्थी वसतीगृहाच्या प्रवेशासाठी पात्र आहेत. शालेय विभागातील इयत्ता 8 वी, कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता 11 वी, बिगर व्यावसायीक महाविद्यालय व व्यावसायीक महाविद्यालयातील प्रथम वर्षातील प्रवेशित विद्यार्थी अर्ज भरण्यास पात्र आहे. प्रवेश अर्ज वसतीगृहातील कार्यालयात विनामुल्य उपलब्ध आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज सादर करावे. जेणेकरुन शासनाकडून मिळणाऱ्या सोयी सुविधांचा लाभ घेणे विद्यार्थ्यांना सोयीचे होईल. असे आवाहन गृहपाल, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह, सवड यांनी केले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे