प्रधानमंत्री स्वनिधी योजना फेरीवाल्यांनी ऑनलाईन अर्ज करावे· 10 हजार रुपयांची कर्ज योजना



प्रधानमंत्री स्वनिधी योजना

फेरीवाल्यांनी ऑनलाईन अर्ज करावे

·         10 हजार रुपयांची कर्ज योजना

वाशिम, दि. 07 (जिमाका) : शहरातील फेरीवाल्यांसाठी/ पथविक्रेत्यांसाठी केंद्र सरकार पुरस्कृत प्रधानमंत्री स्वनिधी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत फेरीवाल्यांना सुक्ष्म-पतपुरवठा करण्यात येतो. या योजनेची वाशिम शहरात अंमलबजावणी करण्यात येत आहे. शहरातील फेरीवाल्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. या योजनेअंतर्गत फेरीवाल्यांना 10 हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पात्र फेरीवाल्यांनी/ पथविक्रेत्यांनी सीएससी सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्रात जावून आपला अर्ज भरावा. ज्या लाभार्थ्यांनी यापूर्वी या योजनेअंतर्गत घेतलेल्या 10 हजार रुपये कर्जाची परतफेड सुरळीत केली आहे, अशा लाभार्थ्यांनी बँकेत जाऊन पहिले कर्ज भरल्याबाबतचे नाहरकत प्रमाणपत्र घेवून 20 हजार रुपये कर्ज मिळण्यासाठी सीएससी सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्रात जावून आपला अर्ज ऑनलाईन भरावा. अर्जाची प्रत बँकेत सादर करुन 20 हजार रुपये भांडवली कर्ज योजनेचा लाभ बँकामार्फत उपलब्ध करुन घ्यावा. असे आवाहन वाशिम नगर पालिकेचे मुख्याधिकारी दीपक मोरे यांनी केले आहे.         

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे